नवी मुंबई : शीव-पनवेल मार्गावारीन नेरूळ उड्डाणपुलाच्या कॉंक्रीटीकरणाचे काम १४ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी पर्यत चालणार असून त्याचा भार वाहतूक पोलिसांवर असणार आहे. यामुळे डोकेदुखी वाहन चालकांना होणार आहे, कारण यासाठी केलेल्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत.
शीव पनवेल मार्गावर वाशी ते उरणफाटा पर्यत अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. वाशी प्लाझा सिग्नल , वाशी प्लाझा आणि समोरील सानपाडा उड्डाणपुला शेजारी बाहेर गावी जाणाऱ्या प्रवासी बस गाड्यांचा थांबा, शिरवणे येथून एमआयडीसी सेवा मार्गाकडे जाणारा आणि सरळ मुख्य रस्ता तसेच सर्वात जास्त नेरूळ उड्डाणपुलाखालील वाहतूक , तसेच या वाहतूक कोंडीतून सुटल्यावर सुसाट निघणार्या गाड्या उरणफाटा सिग्नल जवळ जात असल्याने तेथेही सुमारे एक किलोमीटर पर्यत रांगा लागत आहेत. शिरवणे ते उरणफाटा हे सुमारे अडीच किलोमीटर अंतर पार करण्यास किमान पाऊण तासांचा कालावधी लागत आहे. या सर्व ठिकाणी पुरेसे वाहतूक पोलीस मनुष्यबळ असले तरी संध्याकाळी सहा ते रात्री साडेदहा अकरा पर्यत राज्य परिवहन आणि खाजगी अशा केवळ प्रवासी बस हजारोच्या संख्येने, त्या शिवाय बेस्ट एनएमएमटी, तर इतरही त्यापेक्षा जास्त वाहने पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतात.
हेही वाचा: उरण : मोरा-मुंबई जलसेवा आज चार तास बंद राहणार
एमआयडीसी सेवा रस्त्यावरील वाहने आणि मुख्य रस्त्यावरील वाहने नेरूळ उड्डाणपुलाखाली येतात. त्यात हार्डेलिया कंपनी ते नेरूळ पर्यंतच पुण्याच्या दिशेने जाणारा सेवा रस्ता वापरला जात असल्याने या ठिकाणी सेवा रस्त्यावरील विरुद्ध दिशेची वाहने येत असल्याने त्यांना नियंत्रित करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. त्यामुळे हर्डेलिया कंपनी पासून एमआयडीसीचा सेवा रस्त्यावर जाणारी वाहने नेरूळ उड्डाणपुलाखाली न वळवता थेट उरण फाटा पर्यत जाऊ द्यावा असा उपाय माजी वाहतूक पोलीस कर्मचारी सुरज नाईक यांनी सुचवला आहे.
त्यामुळे नेरूळ उड्डाणपुलाखालील वाहतूक कोडी मोठ्या प्रमाणात सुटेल तसेच उरण फाटा ते नेरूळ उड्डाणपूल मुंबई कडे जाणारी एमआयडीसी सेवा रस्त्यावरील वाहतूक निदान संध्याकाळी सहा ते रात्री अकरा पर्यत बंद करावी त्यांना पर्यायी मुख्य रस्ता आहेच. असेही नाईक यांनी सुचवले या शिवाय व्यापारी बंदर जेएनपीटी वर जाणारी येणारी जड अवजड कंटेनर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. यासर्व गाड्यासह अन्यही माल वाहतूक करणारी जड अवजड वाहने वाहतूक कोंडीचे एक महत्वाचे कारण ठरत असून या गाड्याना रात्री अकरा ते सकाळी सहा पर्यतच या मार्गावर परवानगी द्यावी असाही विचार वाहतूक विभाग करीत आहे.
हेही वाचा: नवी मुंबई : ऐरोली येथील जैवविविधता केंद्रात बोटिंग सफर सुरू
तिरुपती काकडे ( पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग) सुरवातीचे काही दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला मात्र सध्या वाशी, सानपाडा व सीबीडी येथे नियमित वाहतूक करण्यात यश आले आहे. नेरूळ शिरवणे येथे मात्र अजून उपाययोजना करावा लागणार असून जड अवजड वाहनांना गर्दीच्या वेळी बंदी. आणि सेवा रस्त्यावरील मुंबई कडील वाहतूक बंद करून पर्याय देणे या बाबत विचार सुरु असून लवकरच निर्णय घेण्यात येईल.