पनवेल ः न्हावाशेवा या परिसरातील एका व्यक्तीची साडेदहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास करताना नवी मुंबई पोलीसांच्या सायबर पथकातील ऑनलाईन फसवणूक करणा-या मोठ्या टोळीचा छडा लावला. वसई विरार परिसरातील एका गाळ्यातून ही टोळी सक्रिय होती. बनावट कागदपत्रांच्या साह्याने बॅंक खाती उघडून त्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूकीची रक्कम काढण्यासाठी ही टोळी काम करत होती. २२ व ३४ वर्षीय वयाच्या तरुणांना पोलीसांनी अटक केली आहे. 

न्हावाशेवा येथे राहणा-या व्यक्तीला समाजमाध्यमांवरील ‘टींडर’ अॅपवर ‘इमली’ नावाच्या महिने संपर्क साधला. चांगल्या परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून पीडीत व्यक्तीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅवर इमली हीने www.flowertra.com ही लिंक पाठवली होती. या लिंकमध्ये पीडीत व्यक्तीला त्यांचे खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पीडीत व्यक्तीची १० लाख ४० हजार २१२ रुपयांच्या रकमा  वेगवेगळया बनावट बैंक खात्यामध्ये वळती करुन आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नवी मुंबई सायबर विभागाच्या वरीष्ट पोलिस निरिक्षक दिपाली पाटील यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक वृषाली पवार, महिला पोलीस हवालदार प्रगती म्हात्रे, पोलिस शिपाई अतुल मोहिते, पोलिस शिपाई विकी भोगम व पोलिस शिपाई समीर साळुंखे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करीत होते. ज्या बॅंक खात्यातून फसवणूकीची रक्कम वळती झाली त्या बॅंक खातेधारकांचा शोध घेत असताना पोलीसांना ‘वसई-विरार’ येथे बँक खाते उघडण्यासाठी बनावट दस्त बनविणारी टोळी सक्रिय असल्याचे समजले.

customs superintendent killed and two others injured when they collided with illegally parked tempo
रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार 
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Ladki Bahin Yojana Suspend
Ladki Bahin Yojana : निवडणूक आयोगाचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारला महत्त्वाचे निर्देश!
maratha reservation balaji kalyankar viral video
“तुम्ही स्वत:साठी पक्ष बदलता, पण…”, शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल; जरांगे पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
house rent in mumbai brain drain
मुंबईत वाढत्या घरभाड्यांमुळे ‘ब्रेन-ड्रेन’ होतंय, लोक कमावतायत कमी आणि भाडं भरतायत जास्त!
Baba Siddique Links With Dawood What Nana Patole says
‘बाबा सिद्दिकी यांचे दाऊदशी संबंध’, लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक दावे; तर नाना पटोले म्हणतात, ‘दाल मे कुछ काला’
MNS president Raj Thackeray to inaugurate Raju Patils election central campaign office in Dombivli
Maharashtra News Live : मनसेच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा… रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार 

वसई रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर एका इमारतीमधील गाळ्यात काही तरुणमुले संशयास्पद रीत्या हालचाली असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी तेथे धाड घातली. त्यावेळेस तेथे ९ मुले सापडली. त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यापैकी सुधीर जैन व संदेश जैन या संशयीत मुलांच्या बॅगमध्ये ५२ वेगवेगळया बँकांचे डेबिट कार्ड, १८ मोबाईल, १७ चेकबुक, १५ सिमकार्ड, ८ आधारकार्ड, ७ पॅनकार्ड, ३ वाहनचालक परवाना, २ मतदान ओळखपत्र, बनावट व्यवसाय व्हीजीटींग कार्ड अशी कागदपत्र सापडल्याने पोलीसही चक्रावले. अधिक चौकशीनंतर संदेश व सूधीर ही खोटी नावे असून यांची खरी नावे हिमांशु सेन आणि योगेश जैन असल्याचे पोलीसांना समजले. हिमांश व योगेश यांनी मुंबई व उपनगरातील इतर साथीदारांशी संगनमत करून ही टोळी चालवत होते. वसई, विरार, गोरेगांव व इतर ठिकाणी ही टोळी भाड्याने गाळे घेवुन तेथे उत्तरप्रदेश, राजस्थान अशा इतरत्र राज्यातील मुलांना कामाकरीता बोलावुन त्या मुलांच्या नावे वेगवेगळया बँकांचे खाते काढत असल्याचे उजेडात आले. भाडयाने घेतलेल्या गाळ्यावर वेगवेगळया मुलांच्या नावे वेगवेगळे बनावट भाडेकरार बनवुन आणि बनावट पोलीस चारीत्र्यपडताळणी प्रमाणपत्राची कागदपत्रे बनवुन वेगवेगळ्या बँकांमध्ये व्यवसायांचे चालू (करंट) खाते काढतात. बँक खाते सूरु झाल्यानंतर त्याचे सिमकार्ड व डेबिटकार्ड हे ट्रेनने उदयपुर, राजस्थान येथील त्यांच्या साथीदारांना पाठवतात. त्यानंतर या बँक खात्याचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी केला जात असल्याची माहिती संशयीत फसवणूक करणा-यांनी पोलीसांना दिली. या प्रकरणीत अटकेत असलेल्या दोघा संशय़ीतांना पोलीस कोठडी न्यायालयाने सूनावली आहे. 

हेही वाचा…पनवेल: भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयुक्तांचे बदलीशस्त्र

पॅन कार्ड, आधारकार्ड, लिंक मोबाईल नंबर किंवा बँक खात्याची माहिती / प्रत कोणासही विनाकारण वापरण्याकरीता देवु नये. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार फसवणुक रक्कम घेण्याकरीता बँक खात्यांचा वापर करु शकतील. अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई पोलीस