नवी मुंबई : मंगळवारी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र ऐन गर्दीच्या वेळी कार्यक्रमाची वेळ असल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना समान्यजणांना करावा लागला. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे , कार्यकर्ता मार्गदर्शन सभा, बैठक आणि जनसंवाद असे विविध कार्यक्रम होते. त्यात संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान महात्मा गांधी कॉम्प्लेक्स परिसरात जनसंवाद कार्यक्रम ठेवण्यात आला. वास्तविक यावेळेस सदर परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक असते. हा परिसर बाजार परिसर असल्याने पादचारी लोकांचीही गर्दी आले त्यातच  सध्या शारदीय नवरात्र सुरू असल्याने खरेदी करण्यास आलेली गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. एकंदरीत अशा परिस्थितीत किमान २५ गाड्यांचा ताफा सायरन वाजवत या ठिकाणी थांबला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जनसंवाद दौरा: २०२४ आमचेच – बावनकुळे 

बावनकुळे, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे , विधान परिषद आमदार रमेश पाटील,  अध्यक्ष संदीप नाईक, अशी व्हीआयपींची जंत्रीच्या उपस्थितीत व्यवसायिकांशी संवाद साधणे सुरू करण्यात आले. भाजपने केलेले कार्य कथन व आगामी पंतप्रधान कोण ? असा जनसंवाद कार्यक्रम सुमारे अर्धा तास सुरू होता. एवढे।  व्हीआयपींची जंत्री असल्याने हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होतीच. या सर्वा मुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकला तो सामान्य नवी मुंबई कर . येथे झालेल्या वाहतूक कोंडी मुळे वाशी डेपो पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जैन मंदिर सिग्नल वर तर सिग्नल सुटला तरीही गाड्या तसूभर ही हलल्या नाही. त्यामुळे याही चौकात चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली ती वेगळीच. जैन मंदिर ते जुहूगाव के सुमारे एक किलोमीटरचे अंतर कापण्यास गाड्यांना अर्धा तास लागला. वाहतूक कोंडी परिस्थीती पाहून बस मधून उतरून चालत जाण्याचा मार्ग अनेकांनी अवलंबिला. या सर्वात वाहतूक पोलिसांचीही दमछाक झाली. कार्यक्रम आयोजकांना नवी मुंबईतील गर्दीची वाहतूक कोंडीची ठिकाणे माहिती असूनही ही वेळ निवडणे म्हणजे बेफिकरी असल्याची प्रतिक्रिया नेहा पाटील या जेष्ठ नागरिक बस प्रवासी महिलेने दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai residents face huge traffic jams during jan samvad program of maharashtra bjp chief chandrashekhar bawankule zws
Show comments