खरेदीकडे वाढता कल; दुचाकी, चारचाकींना अधिक मागणी
पूनम सकपाळ
नवी मुंबई : केंद्रासह राज्य सरकार पर्यावरणपूरक विद्युत वाहन खरेदीसाठी सवलती देत असल्याने विद्युत वाहन खरेदीकडे वाहनप्रेमी वळत असल्याचे दिसत आहे. नवी मुंबईत गेल्या वर्षभरात ८२४ विद्युत वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली आहे. ही संख्या सकारात्मक असल्याचे आरटीओचे म्हणणे आहे.
पारंपरिक इंधनांची होत असलेली दरवाढ व त्यामुळे होत असलेले प्रदूषण ही एक देशासमोरील मोठी समस्या आहे. त्यामुळे पर्यायी पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकार गेली तीन वर्षे यासाठी धोरण आखत असून फेम एक व फेम दोन या योजना आतापर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. यात विद्युत वाहनांची निर्मिती, पायाभूत सुविधा व ही वाहने खरेदीकडे लोकांना आकृष्ट करणे असे धोरण आहे. यासाठी केंद्रासह राज्य सरकारने काही सवलती देऊ केल्या आहेत. त्यानुसार आता विद्युत वाहन खरेदी वाढताना दिसत आहे.
नवी मुंबई शहरात ५० टक्के विद्युत वाहन खरेदीसाठी कल वाढला आहे. या वर्षी एप्रिल २०२१ पासून ते आतापर्यंत आरटीओकडे ८२४ विद्युत वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये ४९२ दुचाकी असून त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर चारचाकी २०६ आणि ११५ बसचा समावेश आहे.
विद्युत वाहनांची नोंदणी
वाहन प्रकार नोंदणी संख्या
दुचाकी ४९२
चारचाकी २०६
बस ११५
रिक्षा १
तीनचाकी १०
एकूण ८२४

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहरात सध्या विद्युत वाहने खरेदीसाठी कल वाढला आहे. ५० टक्के विद्युत वाहने खरेदी होत आहे. वर्षभरात आरटीओकडे ८२४ विद्युत वाहनांची नोंद झाली आहे. – हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, वाशी

नवी मुंबई शहरात सध्या विद्युत वाहने खरेदीसाठी कल वाढला आहे. ५० टक्के विद्युत वाहने खरेदी होत आहे. वर्षभरात आरटीओकडे ८२४ विद्युत वाहनांची नोंद झाली आहे. – हेमांगी पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, वाशी