नवी मुंबई : नवी मुंबई शहराचा आयकॉनिक ठरणारा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे विज्ञान केंद्र. नेरुळ येथील वंडर्स पार्कलगतच होत असलेल्या विज्ञान केंद्राचे काम पूर्णत्वास आले आहे. केंद्राच्या अवघड अशा डोमसह ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच विज्ञान केंद्रामध्ये ठेवण्यात येणाऱ्या विज्ञान स्कीटसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०९ कोटी खर्चाच्या या प्रकल्पाच्या निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. नवी मुंबई शहराची नवी ओळख म्हणून ठरणाऱ्या प्रकल्पामुळे मुंबई, बंगळूर व पिंपरी चिंचवड शहराप्रमाणेच नवी मुंबईत विज्ञान केंद्र निर्माण आकारास येत आहे. पालिकेने नेरुळ सेक्टर १९ अ वंडर्स पार्कच्या नजिकच दहा हेक्टर भूखंडापैकी दोन हेक्टरचा भूखंड या विज्ञान केंद्रासाठी ठेवला आहे. येथील संपूर्ण भूखंड चिल्ड्रन पार्क म्हणून सिडकोने राखीव ठेवला होता. काही भागावर वंडर्स पार्क उभारले असून शिल्लक दोन हेक्टर भूखंडावर पालिकेचे देखणे विज्ञान केंद्र आकारास येत आहे. यात जागतिक दर्जाच्या केंद्रात पायाभूत सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. विज्ञान केंद्र आजच्या लहान मुलांसाठी आकर्षक, रोजच्या व्यवहारात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर काय आहे, भविष्यात याचा फायदा याची प्रचिती देणारे ठरावे यासाठी पर्यावरण, जीवन, ऊर्जा, यंत्र व रोबोट, अंतराळ घटकांचा त्याच्यात अंतर्भाव आहे.

नवी मुंबई शहरात विज्ञानकेंद्रामुळे शहराला वेगळा आयाम मिळणार असून शहरासाठी हा प्रकल्प आय़कॉनिक ठरणार आहे. ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच विज्ञान साहित्यासाठी निविदा काढली जाणार आहे. – शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नमुंमपा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai science center work nerul ssb