उरण : महामुंबई सेझ विरोधात अखंड शिवसेनेने बेलापूर येथील कोकण भवन व सिडको कार्यालयात केलेल्या आंदोलनातील गुन्ह्या प्रकरणी उरणचे शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह सात कार्यकर्त्यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही

हेही वाचा – महायुतीतील संघर्षात मविआला संधी? भाजपसमोर पक्षांतर्गत वाद; शिंदे गटाच्या नाराजीचे आव्हान

उरण, पनवेल व पेण तालुक्यातील ४५ गावातील ३० हजार एकर जमिनीवर महामुंबई सेझ प्रकल्प उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह शिवसेनेचाही विरोध होता. त्यामुळे सेझ हटाव या मागणीसाठी सरकार विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. या आंदोलनात अनेक वाहनांची तोडफोडही झाली होती. या संदर्भात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर बेलापूर न्यायालयात १७ वर्षे सुनावणी सुरू होती. या सुनावणीला वारंवार समन्स देऊनही गैरहजर राहत असल्याने बुधवारी वॉरंट काढण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने सात जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली आहे.

Story img Loader