टाळेबंदीच्या काळात अनेकांची परिस्थिती बेताची झाली असल्याने सध्या विविध पक्षांकडून लोकापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याच जीवनावश्यक वस्तू वाटण्यावरून नवी मुंबईतील बोनकोडे भागातील एका शिवसेना कार्यकर्त्यांने भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुत्रांच्या माहितीनुसार, लोखंडी रॉड, लाकूड यांच्या सहाय्याने शिवसेना कार्यकर्त्याने भाजपा कार्यकर्ते रिझवान दिवान यांच्या डोक्यात मारहाण करीत गंभीर दुखापत केली आहे. स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल यांचे कार्यकर्ते रिझवान दिवान जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करीत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. तसेच नेतेगिरी बंद कर असा दम भरला.

यानंतर सात-आठ जणांनी रिझवान यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडाने अचानक हल्ला केला यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी सिद्दीक फक्की आणि त्याचे साथीदार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी नगरसेवक मुनावर पटेल यांनी केली.