नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी वॉकेथॉनमध्ये २७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नवी मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. करावे नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानात आयोजित स्मार्ट सिटी वॉकेथॉनप्रसंगी असंख्य विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. या वेळी स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली. या वेळी जोसेफ ब्रदर्सनी स्त्री आत्मसन्मान आणि सक्षमीकरण, एकात्मता या विषयांवर रॅप गीते सादर केली. त्याचप्रमाणे नवी मुंबई द बेस्ट सारी दुनिया को बताना है अशा शब्दांत नवी मुंबई इज द स्मार्ट सिटी हे रॅपगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमवेत सूर धरत आय एम स्मार्ट-आय एम नवी मुंबई असा जयघोष केला. या वेळी ५००० हून अधिक फुग्यांद्वारे स्मार्ट नवी मुंबई चॅलेंजचे संदेशफलक हवेत सोडण्यात आले.

Story img Loader