उरण : शहरातील पेन्शनर्स पार्क येथे रात्रीच्या वेळी उभ्या करण्यात येणाऱ्या एनएमएमटी बसेसचे दरवाजे उघडे राहत असल्याने या बसमध्ये मोकाट श्वान मुक्काम करीत आहेत. त्यामुळे बसमधील बाकांवर अस्वच्छता होत आहे. त्याचप्रमाणे पहाटे पाच वाजता मोजके प्रवासी असल्याने या श्वानांपासून प्रवाशांना धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीची बस सेवा ही उरणच्या प्रवाशांसाठी महत्वाची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण शहरातून दररोज पहाटे पाच वाजता नवी मुंबई करीता पहिली बस सोडण्यात येते. त्यामुळे नागरिकांना पुढील प्रवास वेगाने करता येते. त्यासाठी रात्रीच्या वेळी आलेल्या बसेसना दरवाजे नसल्याने ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात तेथील भटके श्वान या बसेसमध्ये मुक्काम करतात. यातील श्वान बसमधील आसनांवर बसून अस्वच्छता करीत आहेत. त्यामुळे बसमध्ये बसणे अवघड होत असल्याची तक्रार उरणमधील सामाजिक कार्यकर्ते सुबोध दरणे यांनी केली आहे. त्यामुळे याची बस व्यवस्थापनाने दक्षता घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : रुग्णालयात वाधवान बंधूंच्या बैठकीला मदत केल्यामुळे सात पोलीसांचे निलंबन

यासंदर्भात एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी उमाकांत जंगले यांनी ही बस सेवा शहरी असल्याने त्यांना दरवाजे नाहीत. त्याचप्रमाणे काही बसचे दरवाजे नादुरुस्त झाले असण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन काळजी घेतली जाईल. परंतु उरण नगरपरिषदेने बसेस, चालक, वाहक, नियंत्रक आदींची व्यवस्था करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai stray dogs in nmmt buses dirty seats citizen scared about dog attacks in nmmt buses at uran css