नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ५ लाखांची रोकड चोरीला गेली. याबाबत तपास केला असता चोरी ही दुकानात काम करणारा कामगार आणि त्याच्या अन्य साथीदाराने केल्याचे समोर आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

नरेश मांझी असे यातील मुख्य आरोपीचे नाव असून यात त्याचा अन्य एक साथीदार सामील आहे. कोपरखैरणे सेक्टर १ येथील सची हॉटेलमध्ये नरेश हा काम करत होता. रविवार त्याचे आणि व्यवस्थापक सुनील शेट्टी यांचे किरकोळ वाद झाले. त्यामुळे तो रागाच्या भरात निघून गेला. दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे हॉटेल उघडले असता गल्ल्याचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले, तसेच गल्ल्यातील पाच लाखांची रोकड आणि सही करून ठेवलेले ४६ धनादेश आढळून आले नाहीत.

हेही वाचा – ‘मावळ’ मतदारसंघात ‘मनसे’ अजूनही प्रचारापासून दूर

हेही वाचा – ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 

याबाबत काम करत असलेल्या सर्वांची चौकशी केली असता नरेश मांझी आढळून आला नाही. तसेच त्याने संपर्क केला तर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यानेच हे कृत्य केले असा संशय व्यक्त करत त्याच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत नरेश आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात घरफोडी केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.  

Story img Loader