नवी मुंबई – बहुचर्चित तिसऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु रविवारी उद्घाटन झाल्यानंतरही सोमवारी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. याबाबत लोकसत्ताने वृत्त जाहीर करताच मंगळवारी हा उड्डाणपूल सर्वांसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक चालकांनी समाधान व्यक्त केले असून या नव्या उड्डाणपुलमुळे या मार्गावरील नेहमीची वाहतूक कोडी फुटली आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाने मुंबई परिसरातील पाचही टोलनाक्यांवर टोलमुक्ती केल्यामुळे सततची होणारी वाहतूक कोंडी फुटली आहे.
हेही वाचा – बँकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून पतीच्या जमिनीवर परस्पर कर्ज
हेही वाचा – रेल्वेत कारकून पदभरती करतो असे सांगून सव्वाकोटी रुपयांची २० जणांची फसवणूक
मुंबईहून पुण्याकडे जाणारी व पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने टोलमुक्तीमुळे सुसाट जात आहेत. वाशी टोल नाक्यावर जवळजवळ १० ते १२ मार्गिकांवर दररोज टोल वसुलीसाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे काही मिनिटांच्या प्रवासासाठी वाहन चालकांना तासंतास टोल नाक्यावर ताटकळत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतु आजपासून झालेल्या टोलमुक्तीमुळे वाहन चालकांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.