हार्बर मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकात येत असलेल्या लोकल ट्रेनचे तीन डबे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे खारकोपर ते नेरुळ लोकल सेवा ठप्प झाली आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/02/खारकोपर-रेल्वे-स्थानकाजवळ-लोकलचे-डबे-घसरले.mp4

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. दुर्घटनेच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पोहचले असून लोकलचे डबे पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai three coaches local train derailed near kharkopar railway station asj