नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची २०४२ मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी मार्बल मार्केट कळंबोली येथे फुटलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी तातडीने बंद करण्यात आला आहे. मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे येथे होणारा आज संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच उद्या सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे
आज नवी मुंबईत संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही ! पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे येथे होणारा आज संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
Written by लोकसत्ता टीम
![Navi Mumbai water disruption,](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/water-8.jpg?w=1024)
First published on: 12-02-2025 at 13:22 IST | © The Indian Express (P) Ltd
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai to face water cuts in evening today zws