नवी मुंबई : नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात नवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन सुरु होते. सकाळी साडे अकरा – बारापर्यंत सदर आंदोलन सुरळीत सुरु होते. मात्र त्यानंतर पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याला विरोध करणाऱ्या पोलिसांवर ट्रक चालकांनी हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करीत मागे हटवले तसेच दगडफेक आणि काठ्यांनी मारहाण केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर १० लाखांचा दंड आणि ७ वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केले. सकाळच्या प्रहरात आंदोलन शांततेत सुरु झाले. पोलिसांनी रस्त्यावरील ट्रक बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. मात्र दुपारी साडे बारा नंतर काही उत्साही ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अटकाव करत असताना, समजूत काढत असताना काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष करीत काठ्यांनी हल्ला केला. यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या.

हेही वाचा : नवी मुंबई : केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात ट्रक चालक रस्त्यावर

एवढ्यावरच हे थांबले नाहीत, तर रस्त्यावर दगड टाकण्यात आले. पोलिसांवर दगडफेक केली गेली आणि काठ्यांनी काही पोलिसांना मारहाण केली गेली. पोलिसांनी अधिक कुमक मागवली आणि लाठीचार्ज करीत ५० पेक्षा अधिक ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एनआरआय पोलिसांनी दिली. मात्र अद्याप वातावरण तणावपूर्ण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai to jnpt road truck drivers protest turns violent police beaten up by truck drivers css
Show comments