नवी मुंबई : सलग सुट्ट्या आल्याने नवी मुंबईत असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठ्या प्रमाणात मालाची आवक झाली होती. त्यात आज माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळावा असे दोन्ही एकत्र आल्याने काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र जागोजागी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने वाहतूक हलती झाली होती. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौथा शनिवार रविवार आणि सोमवारी धुरवड अशा सलग सुट्ट्या आल्याने नवी मुंबईतील रहिवासी बाहेर गावी जाणे, सलग सुट्ट्या असल्याने बाहेरगावाचा कृषी माल दोन दिवस येणार नसल्याने आजच तो पुरवण्यासाठी अतिरिक्त मालाची आवक त्याच बरोबर माथाडी कामगार मेळावा या सर्वांच्या परिणामी एपीएमसी परिसरात प्रचंड गाड्याचे प्रमाणात वाढले होते.

हेही वाचा – मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

नवी मुंबईबाहेर जाणाऱ्या गाड्यांची गर्दी अन्नपूर्णा चौक आणि माथाडी चौकात झाली. त्यात याच परिसरात फळ भाजी मार्केट आणि अन्य मार्केटला जाण्याचा मुख्य रस्ता असल्याने कृषी मालाची वाहतूक याच परिसरात होत होती. तसेच माथाडी मेळावा असल्याने माथाडी नेते कार्यकर्ते काही प्रमाणात माथाडी मापाडी यांच्या गाड्याही याच चौकातून जात असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी तत्काळ पावले उचलत वाहतूक पोलिसांनी जागोजागी वाहतूक पोलीस तैनात केले. दुसरीकडे  ऐन बाजार आवारात मोठ्या प्रमाणात माल वाहतूक ट्रक असल्याने बाहेरून येणाऱ्या ट्रक बाजार समितीत जागा होण्याची वाट पाहत बाहेरच रस्त्याच्या एका कडेला थांबल्या होत्या. याच ट्रकची संख्या शेकडो असल्याने बाहेरील रस्त्यांच्या दोनच मार्गिका वापरता येत होत्या. वाहतूक पोलीस तैनात केल्यावर बेशिस्त वाहन चालकांना चाप लागला. आणि वाहतूक हळू हळू का होईना मात्र हलत राहिली होती. 

दुपारी साडेबारानंतर माथाडी मेळावा सुटल्यावर त्यात भर पडली, मात्र ही शक्यता लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त व्यवस्था ठेवल्याने प्रचंड वाहतूक कोंडी टळली. कांदा बटाटा मार्केट ते तुर्भे स्मशानभूमी हा पायी दहा मिनिटांच्या रस्त्यासाठी किमान अर्धा पाऊण तास लागत होता. हीच अवस्था माथाडी चौक ते अन्नपूर्णा चौक दरम्यान होती. अशी माहिती सदाशिव शिंदे या रिक्षा चालकाने दिली

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

याबाबत एपीएमसी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बडवे यांनी माहिती देताना सांगितले की, सलग सुट्ट्यांमुळे वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यात ट्रक रस्त्याच्या कडेला समितीत जागा होण्याची वाट पाहत उभे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली. वाहतूक कोंडी न होता हळू हळू का होईना वाहतूक हलत ठेवण्यात यश आले. दुपारनंतर परिस्थिती पूर्ण सामान्य होईल. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai traffic congestion in apmc area due to consecutive holidays and gatherings ssb