शिवसेना शिंदे गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी याच संदर्भात नवी मुंबईत “हिंदू गर्जना यात्रा” काढण्यात येणार आहे यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बंदरे आणि खनिज मंत्री दादा भुसे यांच्या सह खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याची सेना टीमही दाखल होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- वेदान्त प्रकल्पाविरोधात उरणमध्ये शिवसेनेकडून निषेध; सह्यांची मोहीम घेत सरकारविरोधात घोषणाबाजी

स्थानिक नेत्यांनी संदर्भात बैठक

‘ही फक्त यात्रा नाही, हा असेल हिंदुत्वाचा नारा’. असे घोषवाक्य घेत दसरा मेळाव्याची जोरदार तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक नेत्यांनी याच संदर्भात एक बैठक घेतली होती. आता शुक्रवारी ऐरोली सेक्टर १५ लेवा पाटील सभागृहात नवी मुंबई शिवसेना शिंदे गटाची एकत्रित बैठक आयोजित केली आहे. यात प्रमुख मार्गदर्शक बंदरे आणि खनिज मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत . या सहा कल्याणचे खासदार व एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी महापौर नरेश म्हस्के व शिवसेना शिंदे गटातील ठाण्याची टीम व उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- रुग्णालय व मेडिकलसाठी सवलतीच्या दरात भूखंड द्या; नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश

शिवसेनेला साजेसा असाच दसरा मेळावा

विजय चौगुले (माजी विरोधीपक्ष नेता व कार्यक्रम मुख्य आयोजक) बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी आमची खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेला साजेसा असाच दसरा मेळावा पार पाडण्याचे आमचे कर्तव्य आहे त्यात नवी मुंबई शिवसेना कमी पडणार नाही.
चौकट: या निमित्ताने शिंदे गट राज्यात आणि चौगुले गट नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन करत आहेत. अशी चर्चा दोन्ही गटातील सामान्य शिवसैनिकात होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai unit of eknath shinde camp prepared for hindu garv garjana yatra dpj