उरण : येथील द्रोणागिरी नोडच्या रहिवाशी परिसरातील पथदिवे सोमवारी भर दिवसा सकाळी १०.३० वाजता सुरूच होते. त्यामुळे पुन्हा एकदा सिडकोच्या वीज वितरण विभागाचा सावळागोंधळ समोर आला आहे. उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडचा विकास केला जात आहे. यामध्ये औद्योगिक व रहिवासी अशा दोन्ही प्रकारचा विकास होत आहे.

हेही वाचा : चोरट्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

येथील वीज पुरवठा करण्याची जबाबदारी ही सिडकोच्या वीज वितरण विभागाची आहे. मात्र उरण मधील द्रोणागिरीच्या औद्योगिक व नागरी परिसरातील विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. उरणमधील उड्डाणपूल, रस्ते यांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी नेहमी बंद असतात तर काही ठिकाणी ये-जा करणारी वीज आहे. याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Story img Loader