उरण : रब्बीच्या हंगामात उरणमध्ये वाल, चवळी,हरभरा, मुगाची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील भात कापणी, बांधणी व झोडणीची कामे आता पूर्णत्वास आली असून येथील शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण तालुका कृषी कार्यालयामार्फत अन्न आणि पोषण सुरक्षा २०२४-२५ या वर्षात भात पड क्षेत्रामध्ये कडधान्य उत्पादन वाढविणे (हरभरा) यासाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना हरभरा या कडधान्याच्या वाटप करण्यात आले आहे. यात चिरनेर परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच किलो हरभरा कडधान्याचे वाटप कृषी सहाय्यक अधिकारी सूरज घरत व कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा : आरक्षित भूखंडावर अतिक्रमण, घणसोलीत रुग्णालयासाठी आरक्षित जमिनीवर भाजी विक्रेत्यांचे बस्तान

उरण तालुक्यात रब्बीची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत. यात भाजीपाला तसेच वाल, चवळी, मूग, हरभरा, पावटा, राई अशी मोठ्या प्रमाणावर कडधान्य पिके येथील शेतकरी घेतात. येथील शेतशिवारातील जमिनीत रब्बी हंगामातील कडधान्य पिकांना जितका हवा तितका ओलावा असल्याने या भागातील शेतशिवारातील कडधान्य पिके मोठ्या जोमाने बहरतात. भात पिकांपेक्षा जास्त नफा देणारी ही कडधान्य पिके असल्यामुळे येथील शेतकरी कडधान्य पिकांवर जास्त भर देत आहेत. मात्र जंगली वानरांच्या आणि मोकाट गुरांच्या मुक्त संचारामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या कडधान्य पिकांची पेरणी केल्यापासून शेतकऱ्यांना दिवसा व रात्रीचा जागता पहारा द्यावा लागत आहे.

हेही वाचा : द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर

नफा देणारी पिके

शेतशिवारातील जमिनीत रब्बी हंगामातील कडधान्य पिकांना जितका हवा तितका ओलावा असल्याने या भागातील शेतशिवारातील कडधान्य पिके मोठ्या जोमाने बहरतात. भात पिकांपेक्षा जास्त नफा देणारी ही कडधान्य पिके असल्यामुळे येथील शेतकरी कडधान्य पिकांवर जास्त भर देत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai uran cultivation of pulses in rabi season css