नवी मुंबई : शहराच्या खाडी किनाऱ्यांलगत असलेल्या पाणथळींच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करताना या पाणथळी नाहीच अशी अजब भूमिका शहरातील शासकीय यंत्रणा घेत असताना गेल्या पंधरवड्यापासून नवी मुंबई, उरण, पनवेलचा खाडीकिनारा आणि पाणथळी यावर्षीदेखील परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने बहरलेला पाहायला मिळत आहे. मोठ्या उद्योगपती आणि बिल्डरांचा डोळा असलेल्या पाम बीच मार्गालगत डी.पी.एस. तलाव, टी.एस.चाणक्य परिसरातील पाणथळींवर यंदा विविध प्रजातींचे पक्षी, लहान कीटक, फुलपाखरे आणि इतर वन्यजीवांच्या छबी टिपण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आणि हौशी छायाचित्रकारांची झुंबड गेल्या काही दिवसांपासून दिसू लागली आहे. यंदा येथील पाणथळींवर फ्लेमिंगोसह कर्ल्यू सँडपायपर, कुरव (सीगल्स), कॉमन रेडशँक, कॉमन ग्रीनशँक अशा पक्ष्यांचे मोठया प्रमाणावर आगमन झाले असून पर्यावरणप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे.

ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये खाडीकिनारा तसेच पाणथळींचे प्रमाण अधिक आहे. या परिसरात विविध प्रजातींचे पक्षी, लहान कीटक, फुलपाखरे, साप अशा वन्यजीवांचा अधिवास आहे. येथे दरवर्षी हिवाळा सुरू होताच विविध प्रजातीच्या परदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. नवी मुंबई शहरातील करावेमधील टी.सी.एस पाणथळीवर या पक्ष्यांचे आगमन झाले असल्याची माहिती पक्षीमित्रांनी दिली. पाम बीच मार्गावरील टी.सी.एस. आणि डी. पी. एस. परिसरातील पाणथळी विदेशी पक्ष्यांचे मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी या ठिकाणी फ्लेमिंगो तसेच विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे आगमन होते.

nana patole loksatta news
महाराष्ट्राचे ‘कमलनाथ’?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sharad pawar meet modi marathi news
शरद पवार-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट
Nilkmal passenger boat case, Crime case Navy speedboat driver , Navy speedboat,
Nilkmal Passenger Boat Case: नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द
mumbai police (1)
पोलिसांच्या मेहनतीची सरकारलाच किंमत नाही; विशेष सुरक्षा तर पुरवली, पण त्याचे ७ कोटी मात्र थकित!
Ram Shinde Elected as Legislative Council Chairperson
Ram Shinde : “राम शिंदे सर, क्लास कसा चालवायचा हे…”, विधानपरिषद सभापतीपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी, सभागृहात हशा!

हेही वाचा – चार नवीन स्मशानभूमींसाठी पनवेल महापालिकेचा १० कोटींचा निधी

गुजरातमधील कच्छ भागातील पाणीसाठा शिल्लक असल्याने अद्याप या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगोचे स्थलांतर झाले नसले तरी या ठिकाणी फ्लेमिंगो बारामाही दर्शन देतात असा पक्षीमित्रांचा दावा आहे. जानेवारी महिन्यात आणखी संख्येने फ्लेमिंगो दाखल होण्याची शक्यता असल्याचे पक्षीमित्र अविनाश भगत यांनी सांगितले. तसेच या पक्ष्यांना पर्यटक अनेकदा खाद्य देत असतात. मात्र पक्ष्यांचे खाद्य शेवाळ, पाण्यातील कीटक असल्याने पर्यटकांनी त्यांना कोणतेही वेगळे खाद्य देऊ नये, असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पक्ष्यांच्या अधिवासाचा मोठा पुरावा

नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारूप विकास आराखड्यात येथील बहुसंख्य पाणथळी संरक्षित करण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला होता. हा आराखडा अंतिम करत असताना मात्र पाणथळींची आरक्षणे बदलून तेथे निवासी संकुलांसाठी मार्ग खुला करून देण्यात आला. यासंबंधी पर्यावरणप्रेमींनी जोरदार आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारने मध्यंतरी याच पाणथळींचे सर्वेक्षण केले आहे. या पाणथळी नाहीतच असे आक्षेप शासकीय यंत्रणांनी घेतल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप आहे. या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास तुरळक प्रमाणात होत असल्याचा दावा काही बिल्डरांच्या प्रतिनिधींनी केला होता. गेल्या पंधरवड्यापासून या ठिकाणी दिसत असलेले नव्या पक्ष्यांचे थव्यांमुळे या पाणथळ जागा पर्यटकांसाठी पुन्हा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

नवी मुंबई, ठाण्याच्या पाणथळींवर आलेले पक्षी

कर्ल्यू सँडपायपर – हे पक्षी लहान पाणथळ शराटी वर्गातील आहेत. हे प्रामुख्याने स्थलांतर करणारे पक्षी आहेत. त्यांचे शरीर लहान आणि सडपातळ असते. त्यांचे पंख तपकिरी करड्या रंगाचे आणि पोटाकडील भाग पांढरा रंगाचा असतो, तर चोच लांबसर आणि टोकाला किंचित वाकडी असते. लांबट काळसर पाय हे त्यांच्या पाणथळ जागेतील हालचालीसाठी उपयुक्त असतात. हे पक्षी उत्तर सायबेरियामधून हिवाळ्यात स्थलांतर करून भारतात येतात.

कॉमन रेडशँक – या पक्ष्याचे लालसर पाय आणि चोच अर्धवट काळसर टोक असते. तर, त्याच्या शरीराचा रंग राखाडी असतो. खाडीतील चिखलट भागातील किंवा उथळ पाण्यातील कीटक, अळ्या हे त्यांचे खाद्य असते.

हेही वाचा – ‘हिरकणी’ रुग्णालयाचा आराखडा अंतिम टप्यात, पनवेल महापालिकेचे दोन एकर जागेवर आठ मजली रुग्णालय

कॉमन ग्रीनशँक – हे पक्षी हिरव्या – करड्या पायांनी आणि पांढऱ्या छातीने ओळखले जातात. या पक्ष्यांची चोच थोडी वरच्या बाजूला वळलेली आणि काळसर रंगाची असते.

दरवर्षी करावे खाडीजवळील टी. सी. एस. पाणथळीवर फ्लेमिंगोसोबतच विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे आगमन होत असते. यात कुरव या पक्ष्यांचा थवा येतो. या थव्यात सुमारे शंभर पक्षी असतात, मात्र मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कुरव पक्षी हजारोंच्या संख्येने आले आहेत. त्याचप्रमाणे या पाणथळींवर होणारे अतिक्रमण आणि खारफुटी झुडपांची कत्तल याचे प्रमाण वाढल्याने धोका निर्माण झाला आहे. या पाणथळींवर भरतीचे पाणी रोखून त्या कोरडे करण्याचा प्रयत्न होत असल्याने तसेच पर्यटकांकडून येथे कचरा केला जात असल्याने स्थलांतरित पक्ष्यांच्या वास्तव्यास धोका निर्माण झाला आहे. – पद्मजा परुळकर, निसर्ग, वन्यजीव छायाचित्रकार

Story img Loader