उरण : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात येणाऱ्या नवी मुंबई नजीकच्या उरण, पनवेल आणि खोपोली या तिन्ही औद्याोगिक व वाढत्या नागरिक परिसरातील प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एनएमएमटी बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडकोच्या माध्यमातून विकसित होणारे उरण आणि पनवेल हे दोन्ही तालुके मुळात नवी मुंबईच्या विस्तार आणि विकासाचाच एक भाग आहेत. यातील पनवेल विभागात काही प्रमाणात एनएमएमटी बस सेवेच्या बससेस काही मार्गावर धावत आहेत. मात्र सध्या पनवेल मधील मुंबई गोवा व मुंबई पुणे या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यावर व मुंबईला जोडणाऱ्या अटलसेतू लगतच्या पळस्पे,नांदगाव विभागात मोठमोठे नागरी प्रकल्प उभे राहू लागले आहेत. या हजारो घरांच्या वस्तीकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.

हेही वाचा : नवी मुंबई : ट्रॅकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण गरजेचे

भविष्यात याच विभागात अनेक घरांचे प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यामुळे येथील नागरी वस्तीला दळणवळणाची सुविधा आवश्यक आहे. तर दुसरीकडे उरण पनवेल तालुक्याच्या मध्यावर सद्या नवी मुंबई विमानतळ बाधितांना जमिनीच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या २२.५ टक्के भूखंडावरील पुष्पक नगराची निर्मिती सुरू आहे. या नव्याने निर्माण होणाऱ्या वस्तीला ही एनएमएमटीची बस सेवा सुरू झाल्यास प्रवासी संख्येने वाढ होऊ शकते. या मार्गावर पनवेल- करंजाडे ते पुष्पक नगर या मार्गावर सेवा सुरू केल्यास नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रवाशांना ही याचा लाभ घेता येईल.

हेही वाचा : करंजाडेवासीय ९ तास विजेविना

अटलसेतूवरील एनएमएमटी बसला प्राधान्य

एनएमएमटीने नेरुळ अटलसेतू मार्गे मुंबई अशी बस सेवा सुरू केली आहे. याचा फायदा नवी मुंबई आणि उलवे नोड मधील मुंबईत नोकरी व्यवसाय करणाऱ्या प्रवाशांना झाला आहे. या बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात आहे. अटलसेतु मुळे उरण ते मुंबई या मार्गातील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे उरणच्या प्रवाशांसाठी उरण ते मंत्रालय अटलसेतू मार्गे एनएमएमटी बस सेवा सुरू करण्याची मागणी वर्षभरापासून केली जात आहे.

हेही वाचा : जुहूगावातील ज्येष्ठ विरंगुळा केंद्राच्या प्रतीक्षेत; केंद्राला योग्य जागा सापडत नसल्याची पालिकेची सबब

उरण पनवेल मार्ग सुरू करण्याची मागणी

उरण पनवेल हा मार्ग एसटी वाहतुकीचा सर्वात जास्त प्रवासी असलेला मार्ग आहे. या मार्गावरील एसटीच्या दर पंधरा मिनिटांनी असलेल्या बसेसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. पनवेल आणि उरण या दोन्ही स्थानकात प्रवाशांना तासंतास वाट पहावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावर एनएमएमटी ने बस सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. हा मार्गही प्रवासी वाहतुकीसाठी फायद्याचा ठरू शकतो.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai uran passenger crowd travel from nmmt buses expecting more buses to be released for passengers css