नवी मुंबई : आज सकाळी साडेसहा पासून पोलीस तीन संशयितांचा पाठलाग वाशी परिसरात करत आहेत. वाशीतील मिनी सी शोर परिसरात असणाऱ्या कांदळवनात हे तीन संशयित घुसल्याने पोलिसांच्या समोर त्यांना शोधण्याचे आव्हान आहे अथक प्रयत्न आणि वेगवान हालचाली मुळे एक संशयित पोलिसांच्या हाती लागला आहे. 

पनवेल परिसरात घरफोडी व अन्य काही गुन्ह्यातील तीन संशयित वाशीत असल्याची माहिती गुन्हे शाखा परिमंडळ दोनच्या युनिटला मिळाली. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तात्काळ वाशीतील मिनी सी शोर परिसरात दाखल झाले. संशयित एका गाडीत असल्याचे समजताच या गाडीचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला 

पोलिसांची चाहूल लागताच तिन्ही संशयितांनी गाडी सागर विहार कडे वळवली . मात्र रस्ता माहिती नसल्याने सेक्टर आठ येथील नर्सरीकडे  वळवली पुढे रस्ता बंद आहे. नेमके त्याच्या गाडीच्या स्टेअरिंग रॉड तुटल्याने गाडी एका ठिकाणी आदळली. संशयितांनी  येथील गर्द कांडाळवनाचा आधार घेत पळून गेले.   मात्र पोलिसांनी थेट जंगलात घुसून शोध मोहीम सुरू केली. यासाठी ड्रोन कॅमेराचे साहाय्य घेण्यात आले. मात्र गर्द झाडी आणि ड्रोन कॅमेराच्या सीमा असल्याने  फारसे हाती लागले नाही. तसेच घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले होते. अशी माहिती सूत्रांनी दिली सकाळी सातच्या सुमारास पोलिसांच्या हाती एक संशयित लागला आहे. आमचे शोधकार्य सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader