पनवेल : पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्याच्या मध्यानंतर पाण्याची स्थिती बदलेल अशी अपेक्षा सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांना होती; परंतु धरणातील जलसाठा अजूनही निम्मासुद्धा भरलेला नाही. हेटवणे धरणातून सिडको पाण्याचा उपसा करून खारघर, उलवे, द्रोणागिरी या परिसरांना पाणीपुरवठा करते. जुलै महिन्यातही पाणीसाठा धरणात कमी असल्याने २० टक्के पाणीकपात सिडकोने लागू केली. त्यामुळे पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना खारघरसह द्रोणागिरी व उलवे वसाहतींमधील नागरिकांना करावा लागत आहे.

सध्या रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे काम असल्यावरच बाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून नागरिकांना दिला असला, तरी पिण्याचे पाणी घरातील नळांना येत नसल्याने खारघरवासीयांवर पिण्याच्या पाण्याचा बाटला दुकानातून चढ्या भावाने खरेदी करण्याची वेळ आली आहे.

Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
river, Indians, source of water, faith, river news,
अभ्यासपूर्ण नदी परिक्रमा
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
water supply in pune hadapsar magarpatta area will be closed
हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !
sky lanterns, heavy rainfall, lanterns, lanterns news,
कंदिलांना काजळी, आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ, बेभरवशी पावसामुळे नुकसान
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
India fight against poverty, poverty, India, poverty news,
भारताचा गरिबीशी लढा कितपत यशस्वी?

हेही वाचा >>> द्रुतगती महामार्गावर अपघाताच्या वेळी सुरक्षेसाठी फक्त सहा पोलीस!

हेटवणे धरणाची क्षमता १४४ दशलक्ष घनमीटर एवढी असून सध्या ५० टक्के पाणीसाठा धरणात आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत पाऊस असाच सुरू राहिल्यास ७० टक्केपेक्षा धरण भरेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सिडकोवासीयांना आणखी महिनाभर पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. खारघर वसाहतीला ८५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र या वसाहतीला ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या आठवड्यातील दोन दिवस पाणी येत नसल्याने रहिवाशांना पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक बेघराला हक्काचे घर देण्याचे उद्दिष्ट आखल्याने राज्य सरकारने सिडको महामंडळाच्या माध्यमातून सर्वाधिक घरे सिडको वसाहतींमध्ये बांधण्याचे नियोजन केले. याच नियोजनातून मागील आठ वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेचे महागृहनिर्माण मोठ्या प्रमाणात खारघर, उलवे, द्रोणागिरी, तळोजा, कळंबोली, कामोठे या परिसरांत सुरू आहे.

हेही वाचा >>> घाऊक बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांवर

दोन लाख घरे बांधून विक्री करण्याचा सिडकोचा उद्देश असल्याने आतापर्यंत ४० हजारांहून अधिक घरांची विक्री शिल्लक आहे. परंतु अडीच लाख नवीन घरे आणि १० लाख जुनी घरे असून या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि सिडकोने दहा वर्षांत नवीन धरण बांधण्याचे कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने पाण्याची समस्या अजूनही तीव्र होत आहे.

पाणीटंचाई दूर होण्यास आणखी चार वर्षे?

हेटवणे धरणातून जलबोगद्याचे काम सुरू असून यासाठी ३००० कोटी रुपये खर्च सिडको करत आहे. या जलबोगद्यातून थेट नवीन जलशुद्धीकरण केंद्र वायाळ येथे पाणीसाठा आणला जाणार आहे. परंतु या प्रकल्पातून प्रत्यक्षात पाणी सिडको वसाहतींमध्ये येण्यासाठी २०२८ साल उजाडणार आहे.

सिडको टँकर देत नसल्याने संताप

सिडको मंडळाने बांधलेल्या खारघरच्या स्वप्नपूर्ती व इतर महागृहनिर्माणांमध्ये अत्यल्प, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांना बहुमजली इमारतीमधील घर दिले, मात्र पाणीकपातीच्या वेळी सिडको मंडळ या गृहनिर्माणामध्ये पाण्याचे टँकरदेखील पाठवत नसल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत.

एक दिवसाची पाणीकपात रद्द

सोमवारी उरणला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे रानसई धरण भरले आहे. त्यामुळे उरणकरांची मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांची पाणीकपात रद्द करून मंगळवारी पाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रानसई धरणातील पाणी साठ्याचा पुरवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पाणी कपात सुरू करण्यात आली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात रानसई धरण काठोकाठ भरून वाहू लागला आहे.