उरण : बहुप्रतिक्षित उरण – खारकोपर लोकल मार्गावरील खारकोपरनंतरचे गव्हाण (जासई जवळील स्थानकाचे काम अपूर्णच आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किमान सहा ते सात महिने लागण्याची शक्यता आहे. स्थानकाचे काम अपूर्ण स्वरूपात असून पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या स्थानकांच्या फलाट, त्यावरील छत आदींसह इतरही कामे अजूनही सुरू आहेत. तर स्थानक परिसरातील वाहनतळ यासह अनेक कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे रखडलेल्या गव्हाण स्थानकाच्या कामामुळे उरण ते खारकोपर मार्गाला सुरू होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, हे सुरू असलेल्या काम आणि त्याच्या वेगावरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : मेथीच्या दरात दुप्पटीने वाढ, घाऊक बाजारात प्रतिजुडी १२-१५ रुपयांवर

हेही वाचा : सारसोळे दुर्घटनेतील नागरीक आठ दिवसानंतरही घराबाहेरच, इमारतीच्या संरचनात्मक अहवालाची प्रतिक्षाच

उरण ते खारकोपर लोकल सेवा सुरू होण्याची उत्सुकता वाढलेली असतानाच उरणच्या प्रवासी व नागरिकांची ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी इच्छा आहे. मात्र खारकोपर ते उरण या लोकल मार्गावरील पहिलं स्थानक हे गव्हाण आहे. या गव्हाण स्थानकाचे काम हे सर्वात उशिरा सुरू झाले आहे. याच परिसरातील शेतकऱ्यांच्या जमीनी व वन विभाग यांच्या परवानगीमुळे या मार्गाचे काम रखडलेले होते. यातील जमीन संपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गव्हाण व जासई या दोन गावांच्या मध्यभागी उरण पनवेल महामार्गा लगत असलेल्या गव्हाण स्थानकाचे काम सुरू असून छताचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Story img Loader