नवी मुंबई महानगर पालिका तसेच नवी मुंबईतील नागरिक झाडे वाचवण्यासाठी तसेच नवीन झाडे लावून त्यांची निगा राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. नवी मुंबई शहरात २०० पेक्षा अधिक उद्याने असून असताना मात्र दुसरीकडे जिवंत झाडांना औषध टाकून जाळण्याचा तसेच अवैध पद्धतीने झाडे तोडण्याऱ्यांना अभय देण्याचे काम उद्यान विभागाचे काही अधिकारी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘मी मोठा शेठ’ म्हणत प्रवाशांची फसवणूक, बघता बघता दागिणे लुटायचे; लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना बेड्या

एकीकडे होर्डिंग बॅनर लावल्याप्रकरणी आपण दखलपात्र  गुन्हा दाखल करत असताना जीवंत झाडे तोडणे किंवा जाळणे या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा अर्थात एनसी दाखल करणे ही दुर्दैवाची बाब आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या विधी विभागाने देखील अनधिकृत वृक्षतोडीबाबत  दखलपात्र गुन्हा करण्याबाबत दिनांक २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कळविले आहे. त्याचप्रमाणे  ३०.ऑक्टोंबर २०२१ रोजी  तत्कालीन पालिका आयुक्त यांनी देखील नवी मुंबई महानगर पालिकेच्या संकेतस्थळावरून अदखलपात्र  नाही तर दखलपात्र गुन्हा नोंदवा असे जाहीर केलेले असताना अद्याप उद्यान विभागाने गांभीर्याने घेतलेले नाही. आज पर्यंत अनेक तक्रारी याबाबत प्राप्त झाल्या असून उद्यान विभागाचे वृक्ष प्राधिकरण अधिकारी मात्र अदखलपात्र गुन्हा नोंदवून समाधान मानत आहेत.

नवी मुंबई महापालिका वृक्षतोडीबाबत गंभीरता घेत नसून झाडे तोडल्यावरही अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात येत आहे परंतु शासनाच्या व महापालिकेच्या नियमानुसार जिवंत झाडे तोडणे याबाबत दखलपात्र गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे सीवूड येथील एका वृक्षतोडीबाबत पालिकेने फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे हे चुकीचे असून याबाबत पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांची भेट घेनार आहे.

नितीन चव्हाण,  कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी युवक  काँग्रेस पार्टी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp activist nitin chavan allegations on nmmc officer for backing those who cut trees illegally