नवी मुंबई  :पाँप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी आणल्यानंतर नवी मुंबईतील नेरूळ येथील पी.एफ.आय च्या कार्यालयाचा बोर्ड स्थानिक पोलीस प्रशासनाने काढाण्यास लावला आहे. पी.एफ.आय चे नेरूळ प्रमुख शेख मोहम्मद आसिफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत स्थानिक पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्यालयावरील बोर्ड काढला असल्याची माहिती दिलीय..

हेही वाचा >>> पनवेल : शव बदलल्याने अंत्यसंस्काराला जाणाऱ्या नातेवाईकांची उडाली धावपळ

मंगळवारी नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातून दोन जणांना अटक केल्या नंतर पी एफ आय विरोधात कारवाई सुरु आहे. देशभरात पीएफआय संघटने वरती सुरू असलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय. नवी मुंबई देखील पीएफआयच्या कार्यालयावरती तसेच अनेक पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेय. पी एफ आय या संघटने वरती पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पी एफ आय चे कार्यालय तसेच मुस्लिम मोहल्लांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. पीएफ आय च्या नेरूळ मधील कार्यालयाचा बोर्ड देखील स्थानिक पोलीस प्रशासनाने काढण्यास लावलाय. एकूणच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. आसिफ शेख (पी.एफ.आय. अध्यक्ष नवी मुंबई) : संघटनेवर बंदी घातल्याचे प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे कळले. तसेच पोलिसांनी संघटनेचा कार्यालय वर लावण्यात आलेला फलक काढण्यास सांगतले. त्या सूचनेनुसार आम्ही फलक काढला आहे.

Story img Loader