नवी मुंबईतील सर्वात महत्वाचा प्रकल्प असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाकडे सर्वांचे डोळे लागलेले असून नवी मुंबईकरांना नवी मुंबईतून पहिले विमान कधी उड्डाण करणार याची उत्सुकता आहे.तर दुसरीकडे शहरातील नेरुळ ते भाऊचा धक्का येथील जलवाहतूकीकडे सर्वांचे डोळे लागले असून करोनाच्यामुळे विलंब झालेले काम गेल्यावर्षी नोव्हेबरमध्ये पूर्ण झाले असून जलवाहतूक परिचलनासाठी अद्याप ठेकेदाराची नियुक्ती न झाल्याने शहरातील हा प्रकल्प कागदावरच राहीला असल्याची खंत नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : दिघा रेल्वे स्थानक लोकल थांब्यासाठी सज्ज ; चाकरमानी, प्रवासी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
बेलापूर येथील जेट्टी येथून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटरटॅक्सीला सुरवात झाली. सकाळी मुंबईकडे जाण्यासाठी एक व सायंकाळी ६.३० वाजता गेट वे पासून बेलापूर अशा दिवसाला दोनच फेऱ्या होणार आहेत.
तर दुसरीकडे सिडकोने जेट्टीचे काम पूर्ण केले असून मेरिटाईम बोर्ड यांच्याद्वारे जलवाहतूक सुरु करण्यात येणार आहे.
नेरूळ जेट्टीच्या काम पूर्ण झाल्यानंतरही येथून जलसेवा सुरू झाली नाही.ही सेवा सुरू झाल्यास नवी मुंबई व मुंबई शहराला काही मिनीटामध्ये जलवाहतूकीने जोडले जाणार आहे.सिडको या ठिकाणी जेट्टीबरोबरच १० बसेस व २० कार येथे पार्क करण्याची सुविधा केली आहे.त्याचप्रमाणे जेट्टीजवळच फुडकोर्ट,बुकींग सुविधा तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.या सर्व कामांसाठीचा एकूण खर्च १११ कोटी रुपये करण्यात आला आहे.
मुंबईच्या शेजारी सिडकोने नियोजनबद्ध वसवलेल्या शहरात शिवडी नाव्हाशेवा सागरी मार्गाचे काम वेगात सुरु असताना दुसरीकडे जेट्टीचे काम पूर्ण होऊनही परिचलनाच्याबाबतीत घोडे अडल्याचे चित्र आहे. नेरुळ ते भाऊचा धक्का या जलमार्गावर जलवाहतूक सुरु करण्यात येणार आहे. सिडकोच्यावतीने नेरुळ येथील जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी १११ कोटी खर्च केले आहेत. नेरुळ येथील जेट्टीचे काम सिडकोमार्फत करण्यात आले आहे.नेरुळ येथील जेट्टीचे काम काम पूर्ण होऊनही या मार्गावरील सेवा सुरु कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
हेही वाचा >>> मच्छिमारांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी उरणच्या बाह्यवळण मार्गाचे काम थांबवले
नवी मुंबईतील नेरुळ ते भाऊचा धक्का सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.कमी वेळात मुंबई शहर नवी मुंबईशी जोडले जाण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. त्यामुळे रस्ते मार्गाने वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या विलंबाऐवजी जेट्टीचा प्रवास कमी वेळात व सुखकर होणार आहे.शासनाने जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले असून मुंबई,ठाणे,नवी मुंबई,अलिबाग,मांडवा जलवाहतुकीने जोडले जात आहे.
नेरुळ येथील जेट्टीपासून भाऊचा धक्कापर्यंत जलवाहतूक सुरु करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने जलवाहतुकीचे परिचलन करण्यासाठी निविदा मागवल्या असून त्यांची नावेही सिडकोलासूपूर्द करण्यात आली आहेत. त्यामुळे सिडकोने परिचलनासाठी ठेकेदार निश्चित करुन द्यावा. त्यानंतर ही सेवाही सुरु करण्याबाबत वेगवान कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.तरच लवकरात लवकर ही सेवा सुरु करण्यासाठी मेरीटाईम बोर्ड तयार आहे.
अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी ,मेरीटाईम बोर्ड
नागरीकांमध्ये सिडकोबाबत नाराजी
सिडकोने १११ कोटी खर्च करुन ही सुविधा अद्याप सुरु न झाल्याने नागरीकांमध्ये मात्र सिडकोबाबत नाराजी आहे.त्यामुळे सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी लवकरात लवकर लक्ष घालून ही जवाहतूकसेवा सुरु करण्याबाबत वेगवान कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.