नवी मुंबई : नेरूळ उड्डाणपुलाचे कॉंक्रीटीकरण काम सुरु झाले आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या वाहन कोंडीने सेवा रस्त्याचा वापर वाढल्याने त्याही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने त्याला पर्यायी रस्ता देण्यात आला आला होता. मात्र त्यातही अंशतः बदल करण्यात आला असून एलपी जंक्शन ते शिरवणे ऐवजी आता एलपी ते हर्डेलिया कंपनी पर्यत रस्ता बंद असणार आहे.
१४ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी पर्यत शीव पनवेल महामार्गावरील एलपी नेरूळ उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम चालणार आहे. हे काम सुरू झाल्या नंतर या ठिकाणची वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहता वाहतूक कोंडी होऊ नये व अपघात होउ नये म्हणून काँक्रीटीकरणाचे काम संपेपर्यंत जड अवजड वाहनांना सेवा रस्त्यावर प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रवेश बंदी शीव पनवेल मार्गालगतच्या एमआयडीसी सेवा रस्त्यावरील एलपी जंक्शन ते शिरवणे अंडरपास पर्यत होती. तसा अहवाल सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आला होता. मात्र तुर्भे पोलिसांनी यात अशातः बदल केले असून एलपी ते शिरवणे ऐवजी एलपी ते हर्डेलिया कंपनी पर्यत सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
असा फेर अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता नेरूळ एलपी ते शिरवणे ऐवजी नेरूळ एलपी ते हर्डेलिया कंपनी कंपनी पर्यत सेवा रस्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गाला पऱ्यायी मार्ग म्हणून शीव पनवेल मार्गावरील मुंबई मार्गिका साठी उरण फाटा येथून एमआयडीसी रस्त्याने फाँक्स वँगन कंपनी मार्गे इच्छित स्थळी जाता येतील. तसेच शीव पनवेल मार्गावर पुणे मार्गीकासाठी सर्व वाहने शरयू मोटर्स येथून हर्डेलिया कंपनी येथील सेवा रस्त्याने आयओसीएल कंपनी मार्गे पुचे जाऊ शकतात. अशी अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र या अधिसुचनेतून पोलीस वाहने, अग्निशमन वाहने व रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आलेले आहे.