दक्षिण व उत्तर नवी मुंबईला जोडणारी बहुप्रतीक्षित नेरुळ रेल्वे मार्गाची सुरक्षा चाचणा पुन्हा पुढे ढकलण्यात आलेली आहे. शनिवारी ही चाचणी केली जाणार होती मात्र मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त सुर्दशन नायक यांच्या तपासणीनंतरच या मार्गाला हिरवा कंदील मिळणार आहे. ही चाचणी लांबणीवर गेल्याने आता रेल्वे मार्ग सुरू होण्यास विलंब लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिडको आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त खर्चाने नवी मुंबईतील रेल्वेचे जाळे विणण्यात आले आहे. येथील रेल्वे बांधकामाचा सर्व खर्च सिडकोने केला असून यात ६७ टक्के वाटा आहे. याच साखळीतील नेरुळ-उरण हा २७ किलोमीटर मार्गाचे काम खारकोपर पर्यंत झालेले आहे. त्यापुढे काही जमीन संपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने सध्या खारकोपरपयर्ज्ञत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार सिडकोने पूर्ण केलेल्या कामाची पाहणी झालेली आहे. आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या मार्गावरील वाहतुक सुरू होणार आहे. या मार्गावर पाच स्थानके असून उलवा या सिडको नोडला महत्त्व येणार आहे. चार तासाची ही चाचणी मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त सुदर्शन नायक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार होती मात्र ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.