उरण : मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या प्रस्तावित उरणमधील जेएनपीए बंदरातील पागोटे ते चौक या ३० किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे मुंबई पुणे मार्गातील जवळपास २० किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अतिजलद गतीने होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३ हजार ३३६ कोटी रुपये खर्चाचा हा मार्ग जेएनपीए ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ ला जोडला जाणार आहे. जेएनपीए बंदरातील वाढत्या कंटेनर हाताळणीमुळे वाहन संख्येतही वाढ होणार आहे. त्यामुळे जेएनपीए मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा मार्ग उभारला जाणार आहे.

हेही वाचा >>> ठाणे वाशी खाडी लवकरच प्रदूषणमुक्त, रासायनिक सांडपाण्यासाठी नव्या वाहिनीचा प्रस्ताव

इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून संबोधण्यात येणारा हा मार्ग जेएनपीए बंदर खोपटे,एमएसआरडीसी, नैना आणि एनएमडीपी असा असणार आहे. भारत माला प्रायोजनेतून या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उरणचे आमदार महेश बालदी यांनी याची मागणी केली होती. त्यानंतर १९ जूनला या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. हा मार्ग उरण, पनवेल, खलापूर आणि कर्जत या रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक गावे ही मुंबई पुण्याशी थेट जोडली जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील हा परिसर आदिवासी व ग्रामीण आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा >>> शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं

दोन बोगदे

या मार्गामुळे उरण तालुक्यातील बोरखार,धाकटी जुई,विंधणे,चिरनेर हा परिसर थेट मुंबई आणि पुणे या दोन शहरांशी जोडला जाणार आहे. अटलसेतूवरून चिर्ले पागोटे मार्गे पुणे असा प्रवास या मार्गाने करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोन या मार्गाऐवजी मुंबई ते चौक असा थेट प्रवास करता येणार आहे. या महत्त्वाकांक्षी मार्गावर दोन बोगदे आहेत. यात चिरनेर त्या पुढील भागात ही बोगदा तयार करण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून या मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू असून अडीच वर्षांच्या कालावधीत हा मार्ग उभारणीचा प्रस्ताव आहे. – यशवंत घोटकर, एनएचआय अधिकारी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New link road in jnpa to cut travel time from mumbai to pune zws