हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई पालिकेची कंपन्यांसाठी नवी नियमावली
शहरातील रस्त्यांवर खोदकाम करताना यापुढे कोणत्याही कंपनीला खोदकामाची परवानगी घेताना कामाचा संपूर्ण तपशील पालिका प्रशासनास सादर करावा लागणार आहे. याशिवाय तातडीने रस्तेदुरुस्ती करून द्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त विनापरवाना आणि बेकायदा रस्ता खोदल्यास खोदकाम शुल्काच्या दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे.
नवी मुंबईत विविध कंपन्यांच्या माध्यमातून कामानिमित्त रस्ते खोदकाम केले जात आहे. यात बऱ्याचदा महावितरणाच्या वतीने आपत्कालीन कामे जाहीर करून खोदकाम केले जाते. मात्र खोदकामानंतर रस्त्यांची दुरुस्ती पूर्वीसारखीच केली जात नाही. याची गंभीर दखल नवी मुंबई महापालिकेने घेतलील आहे.
शहरात कोणत्याही खासगी कंपनी, संस्थेला काही कामानिमित्त रस्त्यांचे खोदकाम करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. ही परवानगी घेताना महापालिकेला त्याचा शुल्क भरणाही करावा लागतो. खासगी कंपन्या मोठय़ा कामांची परवानगी घेते, मात्र वारंवार निघणाऱ्या आपत्कालीन खोदकामांची परवानगी अनेकदा घेतली जात नाही. बहुतांशी वेळी महापालिकेची रस्ते दुरुस्तीची कामे झाल्यानंतर ही अनेक वेळा आपत्कालीन खोदकामे केली जातात. विविध प्राधिकरणे तसेच संस्था यांच्या मार्फत वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदण्यात येत असल्याने रस्ते खराब होतात. याशिवाय असुविधा निर्माण होते, तसेच त्यासाठी खर्च केलेल्या निधीचाही अपव्यय होतो. रस्ते खोदकामानंतर त्यावर फक्त खडींचा भराव टाकला जातो. परंतु काही कालावधीतनंतर डांबरीकरण, काँक्रिटकरणाचे पक्के काम झाले नसल्याने ते रस्ते उखडतात. खोदकाम केल्याने पूर्ण रस्ता खराब होतो. त्यामुळे एखाद्या संस्थेला रस्ता खोदकामाची परवानगी देताना ते किती रस्ता खोदणार आहेत व त्याच्या आसपासची किती जागा रस्ता पूर्ववत करण्यासाठी दुरुस्त करावी लागणार आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देत परवानगी देण्यापूर्वीच खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे असे त्यांनी स्पष्ट निर्देश आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्ते खोदकामाची परवानगी देताना त्याच वेळी रस्ते दुरुस्त करणाऱ्या एजन्सीला दुरुस्तीचा कार्यादेश द्यावा असेही आयुक्तांनी सूचित केले. रस्ता दुरुस्ती लवकर होण्यासाठी प्री कास्ट डक्ट, प्री फॅब्रिकेटेड अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात याव्या असे सांगण्यात आले, जेणेकरून काम लवकर होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही.
पालिकेकडून केवळ खोदकामाची परवानगी घेतली जात होती. यामुळे पालिकेकडे रस्त्यावर किती खोदकाम झाले आहे याची परिपूर्ण माहिती पालिकेडे येत नसे. त्यामुळे आता खोदकाम परवानगी घेताना आता खोदाईचा संपूर्ण तपशील तसेच खोदकाम झाल्याननंतर तात्काळ रस्ते दुरुस्ती करून द्यावी लागणार आहे. – अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका