नवी मुंबई महागनरपालिकेच्या आयोजित होणाऱ्या श्री गणेश दर्शन स्पध्रेत यंदा नवीन पुरस्काराची भर पडली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये नवी मुंबईचा समावेश झाल्याने स्मार्ट गणेशोत्सव या शीर्षकाखाली यंदा स्वतंत्र पारितोषिक दिले जाणार आहे.
महापालिकेतर्फे प्रतिवर्षी पाच सवरेत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पारितोषिके दिली जातात. आकर्षक देखावा, समाजप्रबोधनात्मक विषयावर सजावट, उत्कृष्ट मूर्ती, स्वच्छता व शिस्तबद्धता या शीर्षकाखाली हे पुरस्कार दिले जातात.
केंद्र सरकारच्या स्मार्ट मिशनअंतर्गत निवड झालेल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यामुळे शहरात होणाऱ्या विकासात्मक बदलामुळे शहराची स्मार्ट सिटी अशी ओळख होणार आहे. यामुळे महापालिकेने यंदाच्या गणेश दर्शन स्पध्रेत स्मार्ट गणेशोत्सव ही नवी वर्गवारी केली आहे. या पुरस्कारासाठी मंडळाची निवड करण्यासाठी ७ स्मार्ट बाबींचा विचार होणार आहे. त्यामध्ये गर्दीचे सुयोग्य नियोजन, सीसीटीव्ही सुरक्षा प्रणालीचा वापर, आपत्कालीन स्थितीची उपाययोजना, सजावटीत पर्यावरणाची हानी व ध्वनिप्रदूषण टाळणे, योग्य प्रतिष्ठापना व विर्सजन, निधीचे संकलन- विनियोग यामध्ये ई प्रणालीचा वापर, ऑनलाइन दर्शन, फ्री वाय-फाय अशा बाबींचा सामवेश
आहे.
पालिका आयुक्त दिनेश वाघमारे व महापौर सुधाकर सोनवणे यांच्या संकल्पनेतून पुरस्कारामध्ये या नव्या विभागाचा समावेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा