सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत करण्याची व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरात उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे नव्या वर्षाच्या निमित्ताने वाहने करण्यासाठीही नागरीकांचा कल पाहायला मिळतो. परंतू शहरातील विविध भागात असलेली दुचाकी व चारचाकी वाहनविक्री दुकानदारांनी अशी विक्रीची वाहने रसत्यावरच उभे केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ते बेकायदा वाहनविक्रीच्या पार्किंगसाठी की नागरीकांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : वडापाव विक्री थेट विभाग कार्यालयात; मनसेचे अनोखे आंदोलन
नियोजनबध्द वसवलेल्या नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंगची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा प्रश्न पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा या सर्वच उपनगरात पार्किंगचा प्रश्न अधिक जटील बनला आहे.त्यातच नवीन २०२३ च्या आगमनाच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीसाठी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. शहरातील चारचाकी वाहनांचे तसेच दुचाकी वाहन विक्रीची मोठे शोरुम तसेच शहराअंतर्गत विविध ठिकाणी दुकाने असून नववर्षाच्या सुरवातीलाच वाहन खरेदीसाठी नागरीकांचा उत्साह असतो. त्यामुळे शहरातील वाहन विक्री दुकानांच्या बाहेर रस्त्यावरच या गाड्या बेकायदेशीरपणे उभ्या असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई शहरात वाशी ते कोपरी पामबीच मार्गावर व शहरात अनेक ठिकाणी दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला असून बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगर लागताच रस्त्याच्या दुतर्फा पामबीच मार्गावर पार्किंगचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरात वारंवार वाहतूक पोलीसांमार्फत कारवाई करुनही पार्किंगचा प्रश्न जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.कार्यालयीन वेळेबरोबरच संध्याकाळच्यावेळीही घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना गाडी पार्किंग करायची तरी कुठे असा प्रश्न सातत्याने पडत आहे. बेलापूर ते दिघा प्रत्येक विभागात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे.पार्किंग जागांपेक्षा गाड्या उदंड असे चित्र शहरात सर्वत्र दिसत असताना नववर्षाच्या निमित्ताने नवीन विक्रीसाठी असलेल्या गाड्या रस्त्यावरच उभ्या केल्या जात आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीत गावठी संत्रा, मोसंबीची आवक कमी; दरात वाढ
शहरात खाजगी आस्थापना पार्किंगबाबत हात वर करत असल्याने वाहने रस्त्यावरच पार्किंग होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे पार्किंगचा प्रश्न आगामी काळात अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. पालिकेने बेलापूर येथे पार्किंगसाठी बहुमजली पार्किंग निर्मिती सुरु केली असली तरी वाढत्या वाहनांमुळे शहरात पार्किंगचा प्रश्न आगामी काळात अधिकच गंभीर व जटील होणार आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : वाशी विभागात एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस
नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगबाबत सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.नववर्षानिमित्त वाहनविक्रीसाठी आणलेल्या गाड्या रस्त्यावरच पार्क केल्या जात असलतील तर अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येईल. नो पार्किंग जागेत गाड्या उभ्या केल्या तर कारवाई केली जाणारच आहे.त्यामुळे नागरीकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.