नेरुळ सेक्टर १६ येथे २ महिन्यांपूर्वी नव्याने बसवलेला विद्युतखांब निखळून रस्त्यावर पडला. भर रस्त्यात खांब पडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या एखादया नागरिकाच्या अंगावर पडून किंवा वाहनावर पडून दुर्घटना घडली असती तर कोण जबाबदार होते ? असा प्रश्न सामन्यातून उमटत आहे. हि घटना आज (शुक्रवारी ) सकाळी अकराच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे शहरात नव्याने मजबूत आणि कॉन्क्रीट पाया असलेला व काही आठवड्यापूर्वी हा खांब बसवण्यात आला होता. तरीही अचानक आडवा झाला .
हेही वाचा >>> नवी मुंबई : प्रेयसीला घरी बोलावून प्रियकर आणि नवीन प्रेयसीने मिळून केली मारहाण, गुन्हा दाखल
येथील एका सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवर पडला. सुदैवाने यावेळी कोणी पायी जात नव्हते वा वाहनही या खाली आले नाही. त्यामुळे दुर्घटना टळली आहे. दुर्घटना टळली तरी यामुळे कंत्राटदार करत असलेल्या कामाचा दर्जा कसा आहे हेच समोर आले. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिली. तसेच खाब बसवल्या नंतर त्याचा दर्जा तपासणे (क्वालिटी कंट्रोल) आवश्यक असताना ते केले जात नाही असा दावाही त्यांनी केला. या बाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.