नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर २३ येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) धाड टाकली आहे. सदर ठिकाणी अतिरेकी संघटनेचे काम सुरु असल्याचा संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा- प्रियंका रावत यांचा खून टळू शकला असता का ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही अतिरेकी कारवाईत सक्रीय संघटना असल्याचे निदर्शनास आल्याने भारतात या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र तरीही सदर संघटनेचे सदस्य सक्रीय असल्याने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असते. त्याच अनुशंघाने आज पाहटे अडीच वाजण्याच्या सुमारास नेरूळ येथील सदर कार्यालयावर धाड टाकण्यात आली आहे. सुमारे ५० कर्मचारी अधिकऱ्यांचा ताफा सदर ठिकाणी असून कसून चौकशी करीत आहेत. तसेच तपासात आढळून आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, याबाबत थेट प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला आहे.