नवी मुंबई : तळोजा परिसरात एका नायझेरियन नागरिकाला अंमली  पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्या कडे तब्बल ११ लाख ६० हजार रुपये किमतीचे ११५ ग्रॅम  वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर आरोपी बेकायदा वास्तव्य करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोनिफेस इमेनिके असे यातील अटक आरोपीचे नाव आहे. तळोजा सेक्टर-२ मधील श्रीकृपा रेसिडेन्सी इमारतीत राहणारा नायजेरियन नागरिक हा येथे एमडी या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा  रचून पॉल याला ताब्यात घेत असताना त्याने पोलीस पथकाशी झटपट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पोलिसांनी शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या  प्लास्टिकची पिशवी आढळून आली ज्यात एम डी  अर्थात  मेथाक्युलॉन या अमली पदार्थाची पावडर आढळून आली जिचे वजन केले असता ११४ ग्रॅम भरली.

हेही वाचा >>> उरणांत परंपरेने महाराष्ट्र व कामगार दिन साजरा; अभिवादन,मिरवणूका आणि सभा

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने हि पावडर ओग्बोना पॉल या दुसऱ्या साथीदाराकडून घेतल्याचे समोर आले.  तसेच त्याच्याकडे  पारपत्र वा  व्हिसा नसताना तो गेल्या ३-४ महिन्यांपासून येथे वास्तव्य करून अमली पदार्थाचा व्यवसाय करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.  याप्रकरणी बोनिफेस ईमेनिके विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.बोनिफेस ईमेनिके या नायजेरीयन नागरिकाला वर्षभरापूर्वी ठाणे पोलिसांनी मुंब्रा येथून अमली पदार्थाच्या तस्करीत अटक केली होती. तो काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटला आहे. त्याने पुन्हा तळोजा येथून अमली पदार्थाच्या तस्करीला सुरुवात केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला एमडी या अमली पदार्थासह अटक करण्यात आली असल्याची माहिती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर सय्यद यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigerian held with 115 grams md in taloja area zws
Show comments