नवी मुंबई :  ऐरोली काटई उन्नत खाडी पुल रस्त्याचे काम सुरू आहे. ऐरोली खाडी पुलावर ऐरोली मुलुंड मार्गिकेवर सुरूवातीला जे कुमार कंपनीतर्फे गर्डर टाकण्यासाठी २  रात्री  ( ११.०० ते ०५.०० वा.) पर्यंत परवानगी देणे आवश्यक आहे. गर्डर टाकण्याचे काम दिलेल्या मुदतीत पुर्ण होणे गरजेचे आहे. ऐरोली- मुलुंड रोडवर गर्डर टाकण्याचे काम चालु असताना, खाडी पुलावर ऐरोली कडुन मुलुंडकडे जाणा-या मार्गिकेचे जेथे काम चालू आहे तेथपर्यतचा रस्ता बंद करणे आवश्यक आहे. तसेच नमुद कालावधीत वाहीनीचा काही भाग बंद ठेवल्यास, मुंबई ठाणेकडे जाणारी व येणारी वाहतुक मुलुंड कडुन ऐरोली कडे येणा-या मार्गिके वरून सुरू ठेवावी लागणार आहे. तरी गर्डर टाकण्याचे काम चालु असताना, अवजड वाहनांची वाहतुक दोन्ही बाजुनी मोठया प्रमाणात असल्यामुळे कंपनीस परवानगी दिलेल्या तारीख व वेळी नवी मुंबई कडुन, मुंबई, ठाणे दिशेकडे जाणारी सर्व जड़ व अवजड वाहने यांना बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई कडुन, मुंबई, ठाणे दिशेकडे जाणारी सर्व जड व अवजड वाहने यांना दिनांक ०४ ऑक्टोबर ते दि. ०७ ऑक्टोबर दरम्यान पर्यंत रात्री १२ ते सकाळी.०१ ०६.०० वाजेपर्यंत प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. याला पर्यायी मार्ग १ नवी मुंबई कडुन, मुंबई ठाणे दिशेकडे जाणारी सर्व जड व अवजड वाहने ही महापे येथुन उजव्या दिशेकडे वळण घेउन पुढे शिळफाटा मुंब्रा बायपास मार्गे मुंबई तसेच ठाणे कडे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा >>>हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी मध्यरात्री एनएमएमटी बसच्या ३२ फे-या

दुसरा पर्याय – . मुंबई ठाणे येथुन ऐरोली मार्गे नवी मुंबई येथे येणारी वाहने ही वाशी खाडीपुल अथवा मुंब्रा बायपास शिळफाटा मार्गे नवी मुंबई कडे इच्छित स्थळी जातील.

सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही अवजड वाहने व्यतीरिक्त इतर वाहने तसेच पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night entry of heavy vehicles prohibited on airoli katai route amy