पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी करंजाडे गाव आणि वसाहतीसह डेरवली, वडघर, विचुंबे, उसर्ली, बेलवली, वारदोली, नांदगाव आणि कुडावे या गावांना ३० ऑक्टोबरला सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – मुंबईच्या राडारोड्याचा भार नवी मुंबईवर
हेही वाचा – पोलीस दलाच्या आरोग्यदायी उपक्रमामध्ये नवी मुंबई पोलीस सहभागी
१ नोव्हेंबरला पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने रहिवाशांनी अधिकचा पाणीसाठा करून पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) उपविभागीय अभियंता के. बी. पाटील यांनी केले आहे. के. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायाळ येथील उच्च दाबाचे विज उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कामासोबत कोळखे येथील ओ.एन.जी.सी. वसाहतीच्या प्रवेशव्दारावरील जलवाहिनीला गळती लागल्याने तेथे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. वडघर येथील सत्यम इमारतीशेजारील नाल्यात १८ मीटरची जलवाहिनी बदलणे, पोदी येथील गाढी नदीपात्रात जलवाहिनीची दुरुस्तीचे काम एमजेपीने हाती घेतले आहे.