नवी मुंबई– संत गाडगेबाबा अभियानात पहिले तीन वर्ष सलग महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर व देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराला व महापालिकेला स्वच्छतेत नावलौकीक मिळवून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम तर देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक प्राप्त झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा नवी मुंबईकर नागरीक म्हणून सर्वांनाच शहराचा व नवी मुंबई महापालिकेचा अभिमान बाळगला जात असताना दुसरीकडे देशातल्या अनेक शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबत कमालीची स्पर्धा सुरु झाली असताना या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे नवी मुंबईतील चित्र थंडावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील तलावांच्या ठिकाणी नागरीकांना निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश ठेवले आहेत.नागरीकांनाही घरातील पूजेचे निर्माल्य याच कलशात टाकण्याची सवय लागली आहे. पण निर्माल्य कलश भरल्यानंतरही पालिका हे कलश तात्काळ उचलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे निर्माल्य कलश भरल्यानंतर नागरीक निर्माल्य तलावाच्या जवळ ठेवत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे पालिकेने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा >>> सीवूड्स विभागात पाणीटंचाई; सेक्टर २३ मधील कमीदाबाने पाणीपुरवठ्यामुळे नागरीक हैराण
नवी मुंबईचे अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आयुक्त स्वच्छता अभियानाला किती दिवस बांगर “ बुस्टर ” देणार ? असा प्रश्न आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभाग, पालिका विभाग अधिकारी, व स्वच्छता कर्मचारी यांनीच याबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.स्वच्छ सर्वेक्षण अभियान व नवी मुंबई सध्याची अभियानाबाबतची स्थिती ढेपाळलेली , चिंताजनक आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. शहरात पालिकेने स्वच्छ व सुंदर आणि शहराच्या सौंदर्यात भर घालतील असे तलावांचे सुशोभीकरण केले. देशातील स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला जेव्हापासून सुरवात झाली तेव्हापासूनच नवी मुंबई महापालिकेने या अबियानात भरीव योगदान दिलेले आहे. परंतू शहरात स्वच्छतेबाबत पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या गणेशोत्साबरोबरच वर्षभर नागरीकांना आपल्या घरातील पूजेचे निर्माल्य पाण्यात न टाकता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी निर्माल्य संकलनासाठी शहरातील सर्वच तलावांच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले.
हेही वाचा >>> नवी मुंबई: भाडेकरू म्हणून अर्ज केला निघाली घुसखोर बांगलादेशी
नागरीकांमध्ये बदल झाला.पण पालिकेच्या माध्यमातून या निर्माल्य कलशातील निर्माल्य वेळेत उचलले जात नाही. स्वच्छतेत शहरातील प्रत्येक नागरीकाबरोबरच पालिका अधिकारी, स्वच्छता कर्माचाऱ्यांचे य़ोगदान मोलाचे आहे.देशात तिसरा क्रमांक प्राप्त झाल्यानंतर पालिकेने या अभियानात सिंहाचा वाटा असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केला होता.त्याचवेळी सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया असा निर्धार केला खरा पण आता स्थिती खरच ढेपाळली असल्याचे चित्र आहे.शहरात पुन्हा एकदा रंगरंगोटी व साफसफाईला सुरवात झाली असली तरी या अभियानासाठीचा गेल्यावर्षीचा जोश व उत्साह पालिका मुख्यालयात व शेवटच्या नागरीक व कर्मचाऱ्यापर्यंत दिसून येत नाही.देशात स्वच्छतेत क्रमांक मिळवल्याचा अभिमान वाटत असताना दुसरीकडे शहराचे स्वच्छतेतील स्थान कमी न होता ती वाढवण्याची जबाबदारी समस्त नवी मुंबईकर व प्रशासकीय यंत्रणांची आहे. शहरात फक्त रंगरंगोटी करुन चालत नाही.तर येथील प्रत्येक नागरीकाच्या कृतीतून हे स्वच्छता अभियान मोलाचे ठरते. आता नागरीक सजग असताना पालिकेनेही योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
शहरातील एकूणच स्वच्छता अभियान व तलावांच्या ठिकाणी असलेले निर्माल्य कलश व इतरही गोष्टीबाबत कर्मचाऱ्यांनी व त्या त्या विभागातील विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकारी यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांनी अलर्ट असणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात कडक पावले उचलावी लागतील.
डॉ.बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व व्यवस्थापन विभाग