नवी मुंबई– संत गाडगेबाबा अभियानात पहिले तीन वर्ष सलग महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर व देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराला व महापालिकेला स्वच्छतेत नावलौकीक मिळवून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम तर देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक प्राप्त झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा नवी मुंबईकर नागरीक म्हणून सर्वांनाच शहराचा व नवी मुंबई महापालिकेचा अभिमान बाळगला जात असताना दुसरीकडे देशातल्या अनेक शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाबाबत कमालीची स्पर्धा सुरु झाली असताना या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे नवी मुंबईतील चित्र थंडावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील तलावांच्या ठिकाणी नागरीकांना निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश ठेवले आहेत.नागरीकांनाही घरातील पूजेचे निर्माल्य याच कलशात टाकण्याची सवय लागली आहे. पण निर्माल्य कलश भरल्यानंतरही पालिका हे कलश तात्काळ उचलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे निर्माल्य कलश भरल्यानंतर नागरीक निर्माल्य तलावाच्या जवळ ठेवत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे पालिकेने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा