कारवाईमुळे पालिकेच्या अधिकारांबाबतही  चर्चा सुरु,आयुक्तांचा कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई</strong> महापालिका क्षेत्रातील सीवूड्स पश्चिम येथील न्युरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट हॉस्पिटल सेक्टर ४० येथे  गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु या हॉस्पिटलमध्ये ऑटिझम मुलांसाठी बेकायदेशीरपणे स्टेम सेल थेरपी वापरल्याबद्दल व इतर उपचारांची जाहिरात केल्याबद्दल नवी मुंबई महापालिकेने कारवाई करत या हॉस्पिटलचा परवाना मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी २४ फेब्रुवारीला रद्द केला आहे. परंतू मागील अनेक वर्षापासून सीवूड्स येथे रुग्णालय सुरु होते.परंतू अनेक वर्षानंतर आताच कारवाई का केली गेली याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून पालिका क्षेत्रातील रुग्णालयाचा परवना रद्द करण्याच्या अधिकारावरुन साशंकता निर्माण  झाली आहे.त्यामुळे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनुसार परवानगी दिली असून आता याबाबत विविध चर्चांना पालिकास्तरावर सुरवात झाली असून अनेक वर्षानंतर आत्ताच कारवाई का अशा चर्चा सुरु झाली आहे.परंतू याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता नियमानुसारच कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : बाजारात होळीची लगबग सुरू; नैसर्गिक रंगाने बाजार पेठा फुलल्या

आयसीएमआर नुसार स्टेम सेल थेरपीला ऑटिझम रुग्णासाठी मान्यता नाही. अद्याप या उपचारपद्धतीबद्दल  कोणतेही ठोस संशोधन प्राप्त झाले नसतानाही विविध  ७५ देशातील १२,५०० पेक्षा अधिक रुग्णांवर  या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून नवी मुंबईआल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित उपचारासाठी पाच ते दहा लाख रुपये आकारण्यात येत होते.त्यामुळे चुकीच्या व  मान्यता नसलेल्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये उपचार करत असल्याने या हॉस्पिटलवर नवी मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने  २७ जानेवारीला रुग्णालयाने आम्ही सर्व खुलासा केला असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. परंतू  पालिकेने संबंधित रुग्णालयाने पाठवलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा उल्लेख केला आहे,त्यानंतर पालिका वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता स्टेम सेल थेरपी दिली असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख करत कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> खारकोपर ते नेरुळ-बेलापूर लोकल अकरा तासांनी पूर्ववत; ७-४२ वाजताची ची नेरुळ ते खारकोपर लोकल सुटली

राष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन मंडळानुसार ही थेरपी  नॅशनल मेडीकल कमिशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार  देण्यास परवानगी नाही. त्यामुळे  संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचे पालिकेचे म्हणने  आहे.न्युरोजन हॉस्पिटलचे मालक डॉक्टर आलोक शर्मा तसेच या रुग्णालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.. सीवूडस येथील या रुग्णालयात विविध ७५ देशातील ऑटिझमग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत स्वीडन, कॅनडा, केनिया, बांगलादेश यासह विविध अनेक देशातील रुग्णांवर लाखो रुपये आकारणी करून उपचार करण्यात आले आहेत .परंतु ज्या थेरपीला आयसीएमआर कडून कोणतीही परवानगी नाही त्या थेरपीद्वारे उपचार केल्यामुळे या रुग्णालयावर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगीतले  आहे.तर दुसरीकडे एवढ्या वर्षानंतर पालिकेने केलेली कारवाई नागरीकांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून यामागे पालिका अधिकाऱ्यांचा वेगळा हेतू तर नाही ना अशी चर्चा होऊ लागली आहे.

न्युरोजन रुग्णालयावर परवाना रद्द करण्याची केलेली कारवाई योग्यच : पालिका आयुक्त

नवी मुंबई महापालकाक्षेत्रा न्युरोजन रुग्णालयावर पालिकेने परवाना रद्द करण्याची केलेली कारवाई योग्यच आहे. मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पालिकाक्षेत्रात रुग्णालय परवानगी देण्याबरोबरच  नियमबाह्य उपचारपध्दतीबाबत कारवाईचे अधिकार असून पालिकेने केलेली कारवाई योग्यच  आहे. राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmc chief justify license cancellation of neurogen hospital at seawoods zws