नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखले  येथील पनवेल कर्जत  येथील दुहेरी  रेल्वे मार्गाकरीता जलवाहिनी स्थलांतरीत करणे व  कळंबोली येथे एक्सप्रेस पुलाकाळी दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील लाईन क्रॉसिंग करुन  जलवाहीनी टाकण्यासाठीची अत्यावश्यक कामे करण्यात आली.त्याचप्रमाणे  भोकरपाडा येथील जलशुद्दीकरण केंद्र ,मोरबे धरण ते दिघा  या मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे करणेअत्यावश्यक असल्याने सोमवारी सकाळपासून शहरात  पाणीपुरवठा  विसकळीत झाला होता.त्यामुळे शहरात सलग दोन दिवस पाणीपरवठा विस्कळीत होता.त्यामुळे नवी मुंबईकर नागरीकांना पाण्याचा तुटवडा जाणवला. नवी मुंबई महापालिकेने मंगळवारी रात्री अकरापासून शहरात पाणीपुरवठा सुरु केल्याचे व शहराला बुधवारी सकाळी ४०० एमएलडी पाणीपुरवठा केल्याचा दावा केला असला तरी बुधवारीही शहरात पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा >>> ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला  ४९४ दिवसात १ लाखापेक्षा अधिक नागरीकांची भेट

Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…

शहरात दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतल्याने सोमवारी सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा  पाणीपुरवठा २४ तासासाठी बंद  ठेवण्यात आला होता.  त्यामुळे नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे या देखभालीच्या कामामुळे मंगळवारी संध्याकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा  होण्याचा दावा पालिकेने केला होता.परंतू दुरुस्तीच्या कामाला उशीर झाल्याने मंगळवारी संध्याकाळी उशीरा पाणीपुरवठा सुरु झाला.त्यामुळे मंगळवारीही संध्याकाळी मात्र पाण्याविना नागरीकांचे हाल झाले.वापरासाठी पाणी विकत घेण्याची वेळ नागरीकांवर आली. बुधवारी सकाळी शहरात पाणीपुरवठा सुरु झाला.परंतू मागील दोन दिवसातील पाण्याचा तुटवडा यामुळे शहरात मंगळवारीही पाण्याची टंचाई जाणवली असल्याची माहिती नागरीकांनी दिली.विविध भागात नागरीकांना पिण्यासाठी व वापरासाठी बाटल्यांमधले पाणी विकत घ्यावे लागले.

नवी मुंबई महापालिका ही जलसंपन्न महापालिका असली तरी दुरुस्तीच्या कामामुळे मागील दोन दिवस नवी मुंबईकरांना मात्र पाण्याची टंचाई जाणवली. तर दुसरीकडे काही भागात गढूळ पाण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

शहरात बुधवारी सकाळी पाणी आले परंतू सोमवार मंगळवारी पाणी न मिळाल्यामुळे अधिकच्या पाण्याच्या गरजेमुळे नागरीकांना पाणी तुटवडा जाणवला, तुर्भे, इंदिरानगर परिसरात बुधवारी सकाळीही पाणी तुटवडा जाणवला.

जयेश कांबळे, रहिवाशी तुर्भे, नवी मुंबई

पालिकेचा दावा…..

नवी मुंबई शहरात दोन दिवसाच्या दुरुस्तीनंतर मंगळवारी रात्री १० नंतर मोरबेहून पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता. शहरात सायंकाळी ११ नंतर पाणीपुरवठा सुरु झाला होता.शहराला बुधवारी ४०० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात आला होता. बुधवारी दिवसभरात नागरीकांना आवश्यक पाणी मिळाले. गुरुवारीही अत्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल. अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, मोरबे प्रकल्प