नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखले येथील पनवेल कर्जत येथील दुहेरी रेल्वे मार्गाकरीता जलवाहिनी स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एक्सप्रेस पुलाकाळी दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील लाईन क्रॉसिंग करुन जलवाहीनी टाकण्यासाठीची अत्यावश्यक कामे करण्यात आली.त्याचप्रमाणे भोकरपाडा येथील जलशुद्दीकरण केंद्र ,मोरबे धरण ते दिघा या मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे करणेअत्यावश्यक असल्याने सोमवारी सकाळपासून शहरात पाणीपुरवठा विसकळीत झाला होता.त्यामुळे शहरात सलग दोन दिवस पाणीपरवठा विस्कळीत होता.त्यामुळे नवी मुंबईकर नागरीकांना पाण्याचा तुटवडा जाणवला. नवी मुंबई महापालिकेने मंगळवारी रात्री अकरापासून शहरात पाणीपुरवठा सुरु केल्याचे व शहराला बुधवारी सकाळी ४०० एमएलडी पाणीपुरवठा केल्याचा दावा केला असला तरी बुधवारीही शहरात पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा