नवी मुंबई महापालिका क्षेत्रात साफसफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी बेकायदेशीर काम बंद आंदोलन करू नये असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केल्यानंतरही केल्यानंतरही कामगार संघटनांनी सकाळपासूनच काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
शहरातील विविध भागात कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली असून पालिकेने मात्र रात्रपाळीतील सफाई कामगारांकडून रात्रीचा कचरा उचलला असून सकाळपासून नाका कामगारांकडून साफसफाई व कचरा संकलन सुरू केली असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ अजय गडदे यांनी दिली.
तर दुसरीकडे समाज समता कामगार संघटनेचे प्रमुख मंगेश लाड यांनी पालिका प्रशासनाने कामगार संघटनेची बोलणी करण्यासाठी अकरा वाजताची वेळ दिली असल्याची माहिती मिळत आहे.परंतु अद्याप प्रशासनाकडून ठोस माहिती देण्यात आली नाही. सर्व कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून तुर्भे डम्पिंग ग्राउंड बरोबरच विविध भागात आंदोलन सुरू असल्याची माहिती कंत्राटी सफाई कामगारांचे प्रमुख मंगेश लाड यांनी लोकसत्ताला दिली.