नवी मुंबई शहराला स्वच्छतेमध्ये अव्वल स्थानी आणण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत शहरात जागोजागी स्वच्छता ठेवण्यास कंबर कसली जात आहे. स्वच्छता सर्वेक्षण २०२२ मध्ये देशात तिसरे स्थान पटकावले असून आगामी सर्वेक्षणात देशात नंबरवन येण्यासाठी सर्वोतपरी नियोजन केले जात आहे. नवनिर्वाचित आयुक्तांनी रेल्वे स्थानक आणि शिव पनवेल महामार्गवर परिसरात ही स्वच्छता आणि सुशोभिकरण ठेवण्यासाठी संबंधित प्रशासनाशी संलग्न होऊन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेने एपीएमसी बाजार आवारातील रस्त्यावरील स्वच्छता ठेवणे ठेवण्याची देखील गरज आहे नाहीतर आगामी स्वच्छता सर्वेक्षणात अडचणीचे ठरू शकते.
हेही वाचा >>> नवी मुंबई : बदलत्या हवामानाने स्ट्रॉबेरीचा हंगाम महिनाभर लांबणीवर
एपीएमसी बाजारात मुख्य रस्त्यालगतच रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे . वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दररोज शेतमालालाने भरलेल्या हजारो गाड्या दाखल होत असतात. भाजीपाला परिसर बाहेर मुख्य रस्त्यालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर दिवसेंदिवस कचऱ्याचे साम्राज्य वाढलेली दिसत आहे. हा सर्विस रोड इतर वाहनांना ये-जा करण्यासाठी होता,परंतु त्या जागी कचराच कचरा विखुरलेला असतो. त्यामुळे याठिकाणी फक्त वाहने आतमध्ये जातील अशी तरतूद करून मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यामध्ये लोखंडी जाळी बसविण्यात आलेली आहे. मात्र तरीदेखील त्याठिकाणी काही फेरीवाले बसून राहिलेल्या भाज्या त्याच ठिकाणी फेकून देत आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात नेहमीच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. बाजारातील स्वच्छतेकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत असून नवी मुंबई महानगरपालिकेने देखील या परिसरात स्वच्छता ठेवणे काळाची गरज आहे.