लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात दरवर्षी सर्वत्र गौरी गणपतीचा उत्साह पाहायला मिळत असतो. परंतु करोनानंतर मात्र सर्वच सण, उत्सवावर स्थानिक करोनापासून निर्बंध आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनेही विसर्जनावेळी तलावांवर होणारी गर्दी टाळून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने पालिकेने शहरात जवळजवळ १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. यंदाही पालिका पर्यावरणपुरक गणेशोत्सवाला प्राधान्य देऊन गणेश विसर्जनासाठी अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करणार आहे.

shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Preventive action, maharashtra vidhan sabha elections 2024, Preventive action five districts maharashtra,
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
Marathi entertainment industry, promises, arts sector,
मराठी मनोरंजनसृष्टीसह कला क्षेत्रावर आश्वासनांचा पाऊस, नवीन चित्रनगरी, अनुदान वाढीसह सुसज्ज सोयी-सुविधांचे जाहीरनाम्यात आश्वासन
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

नवी मुंबई शहरात गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन तलावावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तसेच सार्वजनिक विसर्जनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर तलावांच्या ठिकाणी भाविकांना आवरणे कठीण होऊन जाते. मागील दोन वर्ष शहरातील गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले होते त्याप्रमाणे नागरीक व सार्वजनिक मंडळांनीही पालिकेला प्रतिसाद दिला होता. यावर्षीही पालिका शहरात कृत्रिम तलाव निर्मिती सुरवात करणार असून त्यात वाढच करणार असल्याचे संकेत शहर अभियंता विभागाने दिले आहेत.

हेही वाचा… करंजाडे, कामोठे, कळंबोली येथील सिडको वसाहतीत पाण्याची बोंब; पावसाळ्यातही टँकर मागवण्याची वेळ

शहरातील उद्याने, मैदाने, मोकळ्या जागा या ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात येणार आहेत. एकीकडे गणेशोत्सव साध्या पध्दतीने करण्याचे आवाहन केले जात असताना नवी मुंबई महापालिकेमार्फत विसर्जनासाठी नैसर्गिक तलावांचा वापरच टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी एमएस प्रकारच्या फ्रेम असून त्याच्यामध्ये गावी पानतळाप्रमाणे लायनरचे कापड वापरले जाणार असून हे तलाव १० बाय १२ फूट व चार फूट खोलीचे केले जातात. तसेच हे कृत्रिम तलाव विसर्जनानंतर सर्व साहित्य फोल्डींग पध्दतीने ठेवले जात असून त्याचा वापर काही वर्ष करता येतो. शहरात दरवर्षी २३ नैसर्गिक तलावावर विसर्जन झाल्यानंतर या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गाळ साचतो. त्यामुळे तलाव साफ करण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागतो. परंतु आता कृत्रिम तलावांचा वापर वाढत असल्याने पर्यावरणदृष्ट्या कृत्रिम तलावांचा पालिका अधिक वापर करणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. नैसर्गिक तलावांचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व त्यांची संख्याही यावर्षी नवी मुंबईत वाढवली जाणार आहे.

असे असतील तलाव… १३५ पेक्षा अधिक तलाव निर्मिती करणार

गणेशभक्तांच्या तसेच पर्यावरणाच्यादृष्टीने महत्वाचे ठरत असलेले तलाव यंदा वापरण्यात येणार असून १० बाय १२ फूटाचे व ४ फूट खोलीचे हे तलाव शहरात गेल्यावर्षीपेक्षा अधिक कृत्रिम तलाव पालिकेमार्फत करण्याचे नियोजन आहे आहेत. – संजय देसाई, शहर अभियंता