संबंधित अधिकारी अनभिज्ञ
शेखर हंप्रस, नवी मुंबई</strong>
एका बंद पोलीस चौकीला महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयाने अनधिकृत नळजोडणी घेतल्याप्रकरणी नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे याविषयी संबंधित पालिका कर्मचाऱ्यांनाही फारशी माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांच्याही हाती ही नोटीस पडलेली नाही. विशेष म्हणजे या पोलीस चौकीचे उद्घाटन झाले, मात्र त्यानंतर ती कायम बंदच आहे.
नागरिकांना घराजवळ तक्रार करता यावी म्हणून ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चार पोलीस चौक्या उभ्या करण्यात आल्या. त्यात घणसोली सेक्टर- ५, डी- मार्ट , तीन टाकी आणि सेक्टर २३ येथे अशा प्रकारे चार पोलीस चौक्या उभ्या करण्यात आल्या. ऐरोलीच्या तत्कालीन आमदारांच्या उपस्थितीत सेक्टर २३ येथील चौकीचे उद्घाटन समारंभपूर्वक करण्यात आले.
मात्र दोन-चार दिवसांतच या चौकीला टाळे ठोकण्यात आले. तेव्हापासून गेली सहा ते सात वर्षे पोलीस चौक्या बंद अवस्थेत आहेत. माता बाल रुग्णालयासमोरील पोलीस चौकीच्या दारावर महापालिकेच्या इ विभाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे. अनधिकृत नळजोडणी अधिकृत करून घ्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या नोटिशीवर ती कुणी बजावली याचा उल्लेख नाही. तसेच त्याच्यावर तारीखवारही नाही. विशेष म्हणजे या पोलीस चौकीत नळजोडणीच नाही, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.
मला याबाबतीत काहीच माहिती नाही. कदाचित मी येण्यापूर्वी नोटीस बजाविण्यात आली असेल.
-अशोक मडवी, विभाग अधिकारी.
बीट चौकीत फारसे काम चालत नाही. नोटीस नेमकी कशाविषयी आहे, याची माहिती घेतली जाईल.
-शिवाजी आवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.