नवी मुंबई परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) वतीने मंगळवारी बस दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व ३६० बस धावणार आहेत. प्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच, वाहतूक कोंडीसारख्या समस्या टाळण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे.
नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाला २० वष्रे पूर्ण होत आहेत. यानिमित्त काही नवे निर्णय घेण्यात येणार आहेत. एकूण ५६ मार्गावर दरदिवशी ३१९ बस चालवून परिवहनच्या तिजोरीत अवघी २६ लाख जमा होत आहे. यावर बस दिवस चांगला पर्याय ठरेल असा आशावाद व्यक्तकरून या दिवशी किमान ३८ लाख रुपयांचा महसूल जमा होईल असे परिवहन सभापती साबु डॅनियल यांनी स्पष्ट केले. बस दिवस यशस्वी होण्यासाठी परिवहन प्रशासनाने २४ लाख रुपयांचा खर्च केला आहे. नवी मुंबई खारघर, पनवेल, उरण आणि मुंबई परिसरात नेहमीच्या मार्गाव्यतिरिक्त आणखी बस रस्त्यावर उतरवणार आहे. या उपक्रमाला चाबी छोडो अभियान अशी जोड देण्यात आली आहे. एनएनएमटीच्या या उपक्रमात बेस्टसह केडीएमसी व टीएमटी यांनी देखील जादा बसेस सोडण्याचे अश्वासन दिले आहे. असे परिवहन व्यवस्थापक शिरीषा आरदवाड यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा