जगदिश तांडेल

नगरपालिकेकडून सुविधा मिळत नसल्याने परिवहन विभागाचा निर्णय

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
new Thane railway station is being built between Thane and Mulund stations near psychiatric hospital
नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश
Woman suffers heart attack in Amravati Parvatawa bus of State Transport Corporation
अमरावती : धावत्‍या बसमध्‍ये काळाने गाठले! तिकीट काढतानाच महिला…
Bus services stopped in Kurla West after BEST bus accident mumabi news
कुर्ला स्थानकातील बेस्ट सेवा बुधवारीही बंद; प्रवाशांचे हाल
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट

नवी मुंबई ते उरण ही बससेवा १ डिसेंबरपासून तात्पुरती बंद करण्याचा निर्णय नवी मुंबई परिवहन उपक्रमाने घेतला आहे. याची माहिती एका पत्राद्वारे उरण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे. नगरपालिकेकडून आवश्यक सुविधा मिळत नसल्याचे कारण देण्यात आले आहे.

उरणमधील प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. ही सेवा पूर्ववत सुरू राहावी अशी आग्रही मागणी केली आहे.

उरण हा नवी मुंबईचाच एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा ही येथील नागरिक, विद्यार्थी तसेच चाकरमान्यांसाठी लाइफलाइन ठरली आहे. उरण तालुक्यात होत असलेल्या औद्योगिकीकरणाबरोबरच नागरीकरणातही वाढ झाली आहे. नवी मुंबईसह मुंबईलाही हे शहर व परिसर जवळ असल्याने ते या दोन्ही शहरांचे उपनगर म्हणून सध्या विकसित होत आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या एनएमएमटी या परिवहन सेवेच्या बसेस उरण ते नवी मुंबई तसेच तळोजा, कळंबोली, बेलापूर आदी ठिकाणी प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. नवी मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारे तसेच याच परिसरात शिक्षण घेणारे विद्यार्थी या बसेसचा वापर करीत आहेत. बसेसची संख्या जादा असल्याने प्रवाशांना वेगाने प्रवास करता येत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून उरण शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू असल्याने एनएमएमटीचे स्थानक शहरातील ‘पेन्शनर्स पार्क’ याऐवजी चारफाटा ओएनजीसी उरण येथे शहराबाहेर हलविले आहे. या ठिकाणी बसेस उभ्या करण्यात तसेच त्या फिरविण्यास अडथळे निर्माण होत असल्याने ही सेवा तात्पूर्ती खंडित केली जात असल्याचे पत्र उरण नगरपालिकेला देण्यात आले आहे.

प्रवाशांकडून नगरपालिकेविरोधात संताप

उरण बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने उरण परिसरातील प्रवासी उरण नगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एनएमएमटी बसेस उरण शहराच्या बाहेरून सोडल्या जात आहेत, त्यामुळे सकाळी बस पकडण्यासाठी पायपीट करावी लागते. रात्रीच्या वेळी या परिसरात अंधार पडत असल्याने अंधारातूनच वाट काढावी लागत आहे. नगरपालिकेकडून ही सेवा सुरू झाल्यापासून कोणतीही सुविधा न दिल्याने पहाटेच्या बसेस यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई तसेच नवी मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्वागत म्हात्रे यांनी सांगितले.

प्रवासी नवी मुंबई महानगरपालिकेची एनएमएमटी बससेवा ही आम्हाला नवी मुंबईत ये-जा करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र प्रत्येक सणाच्या वेळी नगरपालिकेकडून शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पेन्शनर्स पार्क या स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर बसेस उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा करून बस पकडावी लागत आहे. त्यातच ही सेवा बंद झाल्यास प्रवाशांना प्रवास करणे कठीण होईल.

– कृतिका पाटील, प्रवासी, उरण

आवश्यक असलेल्या सुविधा तसेच बस नियंत्रणासाठी नियंत्रण कक्षाला वीजपुरवठा याची वारंवार मागणी करूनही मिळत नाही. त्यामुळे सेवा तात्पूर्ती खंडीत करीत आहोत.

– शिरीष आधारवड, व्यवस्थापक, एनएमएमटी

एनएमएमटी व्यवस्थापनाच्या मागणीनुसार त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच ही सेवा बंद पडू नये यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

– अवधूत तावडे, मुख्याधिकारी, उरण नगरपालिका

Story img Loader