नवी मुंबईतील वृक्षरुपी हिरवाई हळू हळू नष्ट होत असून याकडे महानगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करीत आहेत. आज शहरातील सर्वच दर्शनी भागातील झाडांवर खिळे ठोकून करण्यात येणाऱ्या जाहिराती वा रोषणाई प्रचंड प्रमाणात दिसून येते. या जाहिरात सामान्य वाटत असल्या तरी वाशीतील महावितरण कार्यालय समोरील झाडांवर अशाच पद्धतीने खिळे ठोकून जाहिराती लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या खिळ्यांना अज्ञात रासायनिक द्रव्य लावल्याने हळू हळू झाडे सुकली गेली. कालांतराने मुळाशीही असेच छिद्र पाडून त्यातही टाकलेल्या अज्ञात रसायन मुळे दोन तीन दिवसात हिरवे झाडे अचानक वाळून गेली होती. झाड वाळल्यावर घोकादायक म्हणून घोषित करीत तोडण्यात आली. या बाबत टीकेची झोड उठल्यावर तत्कालीन अधिकाऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हाही दाखल केला होता. मात्र तो अज्ञात व्यक्ती अद्याप ना पोलिसांना सापडला ना मनपा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा मागोवा घेतला.

हेही वाचा >>> नवी मुंबई: सायकल ट्रॅकमध्ये इको फ्रेंन्डली साहित्य वापराच्या सूचनेची बोळवण?

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
karnataka goverment bans tobbacco products using offices staff
सरकारी कार्यालयातील तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; ‘या’ राज्यात कडक आदेश लागू
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

अशा फुकट्या जाहिरातींच्या मुळे मनपाचा महसूल सुद्धा बुडतो आणि झाडांचेही नुकसान होण्यास सुरवात होते. फुकट जाहिरात केली म्हणून दंडही ठोठावला जात नाही असा दावा दिपांकर सुभ्रतो या रहिवाशाने केला आहे. या बाबत अनेक निवेदने, आंदोलन केले मात्र अधिकारी काहीही कठोर कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या समवेत फिरून अशा जाहिरात लावणार्यांनाच समोर उभे केले जाईल. असा इशारा पर्यावरण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले. सणांच्या काळातही मोठ्या प्रमाणात खिळे ठोकून झाडांवर रोषणाई केली जाते. अशा रोषणाई तून वाशी सेक्टर १७ येथील झाड जळून गेले होते असेही शिंदे यांनी सांगितले. या बाबत वृक्ष प्राधिकरणाचे मनपा उपायुक्त नितीन नार्वेकर यांना विचारणा केली असता आता पर्यत केवळ जाहिराती काढून टाकण्यात येत होत्या आता मात्र थेट गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले.