नवी मुंबईतील वृक्षरुपी हिरवाई हळू हळू नष्ट होत असून याकडे महानगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करीत आहेत. आज शहरातील सर्वच दर्शनी भागातील झाडांवर खिळे ठोकून करण्यात येणाऱ्या जाहिराती वा रोषणाई प्रचंड प्रमाणात दिसून येते. या जाहिरात सामान्य वाटत असल्या तरी वाशीतील महावितरण कार्यालय समोरील झाडांवर अशाच पद्धतीने खिळे ठोकून जाहिराती लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या खिळ्यांना अज्ञात रासायनिक द्रव्य लावल्याने हळू हळू झाडे सुकली गेली. कालांतराने मुळाशीही असेच छिद्र पाडून त्यातही टाकलेल्या अज्ञात रसायन मुळे दोन तीन दिवसात हिरवे झाडे अचानक वाळून गेली होती. झाड वाळल्यावर घोकादायक म्हणून घोषित करीत तोडण्यात आली. या बाबत टीकेची झोड उठल्यावर तत्कालीन अधिकाऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हाही दाखल केला होता. मात्र तो अज्ञात व्यक्ती अद्याप ना पोलिसांना सापडला ना मनपा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा मागोवा घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा